सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर २९ एप्रिल रोजी राहता येथे घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा

राजकुमार गडकरी 

शिर्डी,( प्रतिनिधी )आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळा (सन २०२६–२८) दरम्यान शिर्डी व शनि शिंगणापूर येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांचे आगमन अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील स्वच्छतेविषयी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राहाता पंचायत समितीच्या सभागृहात २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे सादरीकरणाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. कुंभमेळ्याच्या काळात शिर्डी व शनि शिंगणापूर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याचे उद्दिष्ट या कार्यशाळेमध्ये आहे.
कार्यशाळेस शिर्डी लगतच्या ग्रामपंचायतीतील सरपंच, सदस्य, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार, कचरा संकलन करणारे कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, ग्रामसेवक व तलाठी तसेच राहाता पंचायत समिती कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनीही कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिले आहेत.

Post a Comment

0 Comments