लोहगाव (वार्ताहर)
शासकिय अतीक्रमनाच्या नावाखाली आदिवासी भिल्ल समाजाची राहती घरे पाडून आदिवासींच्या संसाराची राखरांगोळी करणार्या दळभद्री राज्यकर्त्यांची आता गय केली जाणार नाही राज्यातील सर्व शासकीय कार्यालयावर एकाच वेळी हल्लाबोल मोर्चा काढून सरकारला सळो की पळून सोडू असा खनखनीत इशारा एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे.
श्री.अहिरे यांनी म्हटले आहे,की गेल्या अनेक वर्षांपासून भिल्ल समाज गायरान जमीनी कसवून आपले कुटुंब पोसत आहे.व तेथेच वास्तव्य करून राहत आहे.कारण या भुतलाचे मुळ मालक आदिवासीच आहेत.त्या मुळे जल, जंगल जमीन या वर आदिवासींचा पहीला अधिकार आहे.असे असतांनाच या दळभद्री राज्यकर्त्यांनी आदिवासींना त्यांच्या हक्का पासून वंचित करण्याचा घाट घातला आहे.
तूम्ही आदिवासींची घरे पाडून काय सिद्ध करणार आहात.तुम्ही बळाचा वापर करून आम्हाला बेघर करनार असाल तर तुम्हीही भिल्ल समाजाच्या वाघांचा सामना करण्याची तयारी ठेवा.सरकारी जमिनी वरील अतिक्रम तुम्ही हटवत आहात मग ज्या धन दांडग्यांनी आदिवासींच्या शेकडो हेक्टर जमीनीवर कब्जा केला, त्या सर्व जमिनी शासन आदिवासींना परत करणार का? असा साधा प्रश्न संतप्त भिल्ल समाजाचा आहे.तेव्हा शासनाने सुरू केलेले हे उपद्व्याप बंद करावे .आता शासनाने पुढची तयारी ठेऊनच आदिवासींची घरे पाडायला यावे.आता तूम्ही कितीही बळाचा वापर करा आम्ही सज्ज आहे तुमच्या स्वागतासाठी आम्ही सदैव तयार आहोत.लवकरच राज्यातील सर्व शासकीय कार्यालयावर एकाच वेळी हल्लाबोल मोर्चा काढला जाणार आहे व शासनाला जाब विचारला जाईल असा इशारा ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सामाजिक कार्यकर्ते व एकलव्य सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे
0 Comments