छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई करा, माळवाडगावात सकल हिंदू समाजाची मागणी

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी- माळवाडगाव येथे राहुरी येथे हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची समाजातील काही विकृतीकडून विटंबना करण्यात आली, या घटनेच्या निषेधार्थ माळवाडगाव येथील व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बाजारपेठ बंद ठेवून झालेला घटनेचा निषेध व्यक्त केला तसेच  शिवप्रेमीनी भवानी माता मंदिर परिसरात निषेध सभा घेऊन विटंबना करणाऱ्याला त्वरित अटक करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली.
       सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब शिंदे यांना यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब आसने, बाळासाहेब हुरुळे, भाजपाचे उद्योग आघाडी उपाध्यक्ष सुरेश आसने यांनी भाषणाद्वारे संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या. त्यांनी राहुरी येथे हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची काही विकृत समाजकंटकांद्वारे विटंबना करण्याची घटना घडली आहे. यामुळे हिंदुस्थानातील समस्त शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना पसरली आहे. यामुळे सामाजिक शांतता भंग झाली असून शासनाने महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या विकृत आरोपीना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्यास यावी, जेणेकरून भविष्यात कोणीही हिंदुस्थानातील महापुरुषांच्या बाबतीत चुकीचा विचार करणार नाही.
      यावेळी बाजीराव आसने, रावसाहेब काळे, दिलीपराव हुरुळे, नानासाहेब आसने, श्रीकांत दळे, भाजपचे तालुका प्रसिद्धीप्रमुख पत्रकार संदीप आसने, जालिंदर आबा आसने, उपसरपंच श्याम आसने, अतिश आसने, राजेंद्र आसने, पत्रकार प्रवीण साळवे, विलास आसने, बाळासाहेब आसने, सुरेश डाखे, अशोक खताळ, मंगेश साळवे, अरुण आसने, रमेश डहाळे, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद जगरूपे, दिगंबर आढाव, काका शेळके, अंकुश आसने, गोरख दळे, अशोक साळवे, योगेश आसने, राजेंद्र आढाव, तुकाराम आसने, दीपक आसने मधुकर आसने लक्ष्मण आसने भानुदास हूरुळे, बाबासाहेब आसने गोकुळ त्रिभुवन विठ्ठल निंबाळकर, अमोल मोरे, संजय बाबर, विठ्ठलराव कावरे, चेतन आसने, पत्रकार रवींद्र आसने मयूर पिंपाळे, बबन दरेकर, बाबासाहेब दरेकर, प्रशांत दळे, किसन त्रिभुवन, पत्रकार विठ्ठलराव आसने, सुनील आसने, विठ्ठल अनुशे, आकाश आसने बाबासाहेब आसने सुनील वाबळे सारंगधर काळे रावसाहेब कसबे  आदींसह शिवप्रेमी व हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त देण्यात आला होता.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप लोखंडे टाकळीभान यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे 

Post a Comment

0 Comments