शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या वतीने नववर्ष व गुढीपाडव्याच्या निमित्ताने या सोसायटीच्या सर्व सभासदांना गुढीपाडवा गोड व्हावा म्हणून गुढीपाडव्यासाठी सणाचा किराणा शिधा भेट म्हणून देण्यात येणार आहे.
साई उद्यानाच्या प्रांगणात डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या शुभहस्ते हा आनंदाचा शिधा सोसायटीच्या वतीने सभासदांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, लेखा अधिकारी मंगल वराडे, प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले ,कार्यकारी अभियंता दाभाडे, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा मंहाडुळे, संस्थांनचे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज,या सर्वांच्या हस्ते हा शिधा वाटप कार्यक्रम संपन्न होणार आहे. यामध्ये गुढीपाडवा सणाचा किराणा भेट देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सोसायटी संचलित साई तीर्थ या मिनरल वॉटर चे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेअरमन विठ्ठलराव पवार, व्हा. चेअरमन पोपटराव कोते, संचालक महादू कांदळकर, संभाजी तुरकणे ,मिलिंद दुंनबळे, भाऊसाहेब लवांडे ,सुनंदा जगताप, कृष्णा आरणे, देविदास जगताप ,तुळशीराम पवार, इकबाल तांबोळी, लता बारसे, भाऊसाहेब कोकाटे ,गोवर्धन कोते ,रवींद्र गायकवाड, गणेश अहिरे, रंभाजी गागरे ,भानुदास लबडे ,सचिव नभाजी डांगे, विलास वाणी ,आदी प्रयत्नशील आहेत.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)
0 Comments