साई संस्थानच्या साईबाबा हॉस्पिटलला गांधीधाम येथील जय साई फाउंडेशन तर्फे 21 लाख रुपये किंमतीचे वैद्यकीय उपकरणे देणगीरुपी भेट!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथील साई संस्थांनच्या श्री साईबाबा हॉस्पिटलला गांधीधाम, गुजरात येथील जय साई फाउंडेशनतर्फे  २१ लाख रुपये किंमतीच्या वैद्यकीय उपकरणांची देणगी रुपी भेट नुकतीच देण्यात आली.

"रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा" या श्री साईबाबांच्या शिकवणीतूनच श्री साईबाबा संस्थानामार्फत हे उपकरणे कार्यान्वित कार्यान्वित करण्यात आले आहे.
  श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा दिली जाते. अनेक साईभक्त आपल्या श्रद्धेच्या भावनेतून संस्थानच्या विविध उपक्रमांसाठी देणगी स्वरूपात योगदान देतात.

अशाच सेवाभावी वृत्तीने गांधीधाम, गुजरात येथील जय साई फाउंडेशनच्या वतीने साईभक्त हसीजा राजीव कुमार, हसिजा मनु, मोहीत जैडका आणि व्हिंकी लुंबा यांनी श्री साईबाबा हॉस्पिटलसाठी ₹२१ लाख मूल्याचे TMT MACHINE आणि GIESTER SURGICAL INSTRUMENT SET देणगी स्वरूपात प्रदान केले.
साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी या देणगीदार साईभक्तांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला.
सदर उपकरणांचे लोकार्पण व पूजन साईभक्त हसीजा राजीव कुमार, हसिजा मनु, मोहीत जैडका आणि व्हिंकी लुंबा यांच्या हस्ते तसेच श्री साईबाबा संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्ट. कर्नल डॉ. शैलेश ओक (से. नि.) व उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले आहे.
या अत्याधुनिक उपकरणांमुळे कार्डिओलॉजी व कार्डियाक सर्जरी विभागातील तपासण्या आणि शस्त्रक्रिया अधिक प्रभावी तंत्रज्ञानाच्या मदतीने करता येणार असून रुग्णांना त्याचा मोठा लाभ होईल ,श्री साईबाबा संस्थानने या अमूल्य योगदानाबद्दल जय साई फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले आणि अशा सेवाभावी उपक्रमांमुळे साईबाबांची शिकवण अधिक दृढ होत असल्याची प्रतिक्रिया संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.
(सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी)

Post a Comment

0 Comments