दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.06 - सोयगाव तालुका सामदेशकच्या प्रभारी तालुका समादेशक पदी संदीप सुरडकर यांची केलेली नियुक्ती रद्द करण्यात येऊन .
सोयगाव तालुका सामदेशक पदी नियमाप्रमाणे योग्य होमगार्ड ची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सोयगाव येथील होमगार्ड यांनी मुख्यमंत्र्यांसह जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान संदीप सुरडकर यांना मे 2022 पासून प्रभारी तालुका सामदेशक म्हणून नियुक्ती देण्यात आली. सदरील नियुक्तीसाठी कोणताही निकष न लावता केवळ राजकीय दबावाखाली नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती करतांना सेवा जेष्ठतेचा विचार केलेला नाही. पथकात मुंबई घाटकोपर निदेशक पाठ्यक्रम, अग्निशमन पाठ्यक्रम तसेच वेळोवेळी घेण्यात आलेले प्रशिक्षणास गेलेले होमगार्ड सदस्य आहेत.त्यांची निवड करतांना कोणत्याही बाबींचा विचार केला नाही ही बाब अत्यंत गंभीर असून याविषयी होमगार्ड यांनी जिल्हा सामदेशक कार्यालयात पत्र व्यवहार करून देखील त्याबाबत कोणताही प्रकारचा विचार केला नाही. संदीप सुरडकर यांची भरती अंदाजे 2019 पासून आहे सदर भरती दिनांकापासून होमगार्ड सदस्य कोणत्या आधारे करण्यात आला या बाबत होमगार्ड संभ्रमात असल्याचे होमगार्ड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सचिव गृहविभाग होमगार्ड कार्यालय मुंबई व जिल्हा सामदेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर यांना देण्यात आलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे. यावर जिल्हा सामदेशक तथा अप्पर पोलिस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर हे राजकिय दबावाला बळी पडतात की चौकशी करून योग्य होमगार्ड यास न्याय देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments