दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि. 24 -- आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दि.24 सोमवारी सुनील गावंडे, मंगेश सोहनी व मयुर मनगटे या भाजप शिष्टमंडळाने सोयगाव तहसिल कार्यालयात दुपारी एक वाजता तहसिल कार्यालयाचा पंचनामा केला असता फक्त सहा कर्मचारी हजर होते तर एक कर्मचारी हजर नसतांना मात्र हजेरी रजिस्टर वर स्वाक्षरी केली असल्याने तहसिल कार्यालयाच्या कारभाराविषयी ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी, तहसीलदारांसह नायब तहसीलदार कर्मचारी तहसील कार्यालयात वेळेवर हजर राहत नसल्याची बातमी दि.17 सोमवारी सत्त्येचा महासंग्राम ने प्रकाशित केली होती त्यावेळी देखील नायब तहसिलदार यांच्यासह कर्मचारी गैरहजर होते. या बातमी कडे तहसीलदार यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने भाजपचे सुनील गावंडे,मंगेश सोहनी व मयुर मनगटे या पदाधिकाऱ्यांनी दि.24 सोमवारी तहसिल कार्यालयात भेट देत संबंधित कर्मचाऱ्यास हजेरी रजिस्टर ची मागणी केली असता त्यात निवृत्ती कापशिकर, शिपाई अनिल पवार, संतोष नवगिरे, गोविंद गोफणे, कोतवाल मनोज आगे व संजय नावकर यांच्या स्वाक्षऱ्या होत्या तर एक कर्मचाऱ्यांनी हजर नसताना त्याने आदल्या दिवशीच हजेरी रजिस्टर वर स्वाक्षरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने आस्थापणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामीण भागांतून 60 किमी अंतरावरील शेतकरी,नागरिक व लाभार्थी असलेल्या वयोवृद्ध व दिव्यांग तहसिल कार्यालयात सकाळी येत असतात. तहसिल कार्यालयात अंशकालीन (कर्मचारी), शिपाई व कोतवाल हजर राहतात इतर ये-जा करीत असल्याने बारा वाजेनंतर तहसिल कार्यालयात येतात त्यामुळे तालुक्यातील जनतेस मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काम न होताच माघारी फिरावे लागते त्यामुळे आर्थिक भुदंड सोसावा लागत आहे. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तालुका स्तरावरील कार्यलयाच्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली नसल्याने अधिकाऱ्यांची मनमानी वाढत आहे याकडे लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केले असून जिल्हाधिकारी यांनी सुद्धा सोयगाव तहसिल कार्यालयाच्या कारभारावर कडे वक्रदृष्टी वळविली नाही.जनतेची समस्या कोण सोडवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भाजप चे शिष्टमंडळ मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे भाजपचे मंगेश सोहनी यांनी सांगितले.
-कारवाई करणार कोण- दि.17 सोमवारी तहसिल कार्यालयात वेळेवर हजर नसलेल्या कर्मचाऱ्यांना तहसीलदार यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने दि.24 सोमवारी वीस पैकी सहाच कर्मचारी हजर असल्याचा धक्कादायक प्रकार भाजपच्या शिष्टमंडळाने उघडकीस आणला. तहसीलदार यांचा कर्मचाऱ्यांवर अंकुश नाही की जाणीवपूर्वक सोंग करीत आहे हे न उलगडणारे कोडे बनत चालले आहे. महायुतीच्या विशेष भाजपला बदनाम करण्याचे तर षडयंत्र नाही ना! अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे.
(सहयोगी पत्रकार दिलीप शिंदे सोयगाव )
0 Comments