टाकळीभान प्रतिनिधी - विधानसभा निवडणुक शेवटच्या टप्यात अवघड वाटली आसली तरी येथील कार्यकर्त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षाचे संघटन मजबुत ठेवल्याने विजय सोपा झाला. कार्यकर्त्यांनी विकास कामाचे प्रस्ताव द्यावेत, जास्तीत जास्त विकास कामांना भरघोस निधी दिला जाईल असे प्रतिपादन आ. हेमंत ओगले यांनी केले.
विविध समस्यांबाबत येथील उपबाजार आवारात कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन मधुकर कोकणे होते तर जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने, काँग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी नगराध्यक्ष संजय फंड, माऊली प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर मुरकुटे, जिल्हा परीषदेचे माजी बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप भोसले, बाजार समितीचे सभापती सुधिर नवले, मुळा प्रवराचे माजी संचालक मंजाबापू थोरात, संचालक राजेंद्र पाऊलबुध्दे, खंडेराव सदाफळ, राजेंद्र चक्रनारायण आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. ओगले म्हणाले या गावाने स्व. माजी आ. जयंतदराव ससाने यांच्यावर आजपर्यंतृ प्रेम केले आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकित येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्याने विजय सोपा झाला. गावच्या विकास कामाबाबत कार्यकर्त्यांची जेवढी मागणी येईल त्यासाठी भरघोस निधी देण्याचे काम केले जाईल. पाटपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाटचार्यांचे काम आवर्तन संपताच हाती घेतले जाईल. त्यामुळे पाण्याची नासाडी टाळली जावुन आधिकचे पाणी शिल्लक राहील. विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी २२० के.व्ही. क्षमतेच्या वीज केंद्राचे काम लवकरच सुरु होणार आहे. आवश्यकता आसेल तेथे नवीन रोहीञ टाकले जाणार आसल्याने पुर्ण दाबाने शेतीसाठी वीज मिळाल्याने येत्या काही दिवसात वीजेचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. यापुढील काळात स्व. माजी आ. जयंतराव ससाने यांच्या पावलावर पाऊल ठेवुनच विकास साधला जाईल असे आ. ओगले यांनी यावेळी आश्वासित केले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने म्हणाले कि, हे गाव स्व. माजी आ. ससाने यांचे आवडते गाव होते. त्यामुळे त्यांनी या गावाच्या विकासासाठी नेहमीच झुकते माप दिले होते. येथील कार्यकर्ते आजही स्व. ससाने यांच्यावर तेवढेच प्रेम करीत आसल्याने व संघटन मजबुत आसल्याने विधानसभा निवडणुत आपेक्षेपेक्षा आधिकचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे गावाच्या सर्वांगिन विकासासाठी पाहीजे तेवढा निधी देण्याची परंपरा सुरुच राहील असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी अनेक आठवणींना उजाळा देत येथील कार्यकर्ते करीत आसलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी ज्ञानेश्वर मुरकुटे यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.
आ. ओगले यांनी निवडणुकिनंतर ग्रामस्थांच्या आडचणी समजुन घेवुन त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रथमच बैठक घेतल्याने ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. माजी सरपंच मंजाबापु थोरात व भारत भवार यांनी प्रस्ताविकातुन वेगवेगळी विकास कामे मांडुन मोठ्या प्रमाणात विकास निधीची मागणी केली. विविध संघटनांच्या वतीनेही यावेळी आ. ओगले यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी टाकळीभान सोसायटीचे चेअरमन एकनाथ पटारे, भाऊसाहेब मगर, शिवादादा धुमाळ,,युटेक शुगरचे संचालक केरुबापु मगर, दत्ताञय मगर, श्रीधर गाडे, विलास दाभाडे, बबनराव मगर, मोहन रणनवरे, युवक काँग्रेसचे सोमनाथ पाबळे, प्रा. विजय बोर्डे, तुकाराम बोडखे, शिवाजी शिरसाठ, शंकरराव पृवार, गोटीराम दाभाडे, रामकृष्ण गायकवाड, विकास मगर, रमेश पटारे, बालाजी पटारे, महेंद्र संत, रावसाहेब गायकवाड,आदींसह विविध संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचलन अॕड. प्रमोद वलटे यांनी केले तर सोमनाथ पाबळे यांनी आभार मानले.
0 Comments