पंतप्रधान मोदीच्या प्रत्येक योजनेतून शेतकऱ्यांना पाठबळ-ना.विखे पाटील(५लाख शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान योजनेचे १०८.३३ कोटी खात्यात जमा )



लोणी दि.२४ प्रतिनिधी

प्रधानमंत्री  किसान सन्मान निधी योजने अंतर्गत  अहील्यानगर जिल्ह्यातील ५लाख ४१ हजार शेतकरी कुटुंबांच्या खात्यात १०८.३३कोटी रूपये जमा झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील कृषी क्षेत्र आत्मनिर्भर होत असून,पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या प्रत्येक योजनेतून शेतकऱ्यांना  पाठबळ देण्याचे काम होत असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.


देशातील शेतकरी कुटुंबासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या किसान सन्मान योजनेचा १९वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा करण्यात आला.यानिमित्ताने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात जलसंपदा मंत्री विखे पाटील दूरदृष्य प्रणाली द्वारे सहभागी झाले होते. बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी विभागाच्या  वतीने आयोजित कार्यक्रमास शेतकरी अधिकारी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यातील एकूण ९२.८९ लाख लाभार्थीना रक्कम रु.१९६७.१२ कोटी रुपयांचा लाभ वितरीत करण्यात आला. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील ५.४१ लाख लाभार्थ्यांना रक्कम रु.१०८.३३ कोटी वितरीत झाले असून योजनेचा १९वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत.

केंद्र सरकारने कृषी विभागाला मोठे पाठबळ दिले असून,शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी सुरू केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्यामुळे देशात कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

किसान सन्मान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होत असून पंतप्रधान मोदीची प्रेरणा घेवून राज्यातील महायुती सरकारने नमो किसान योजना सुरू केली या योजनेची रक्कम १५हजार करण्याचे दिलेल्या आश्वासनाची पूर्ती होईल आशी ग्वाही त्यांनी दिली.

कृषी विज्ञान केंद्रातील कार्यक्रमास  भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष बाबासाहेब डांगे, कृषी भूषण शेतकरी सुदाम सरोदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सागर गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दादासाहेब  खोगरे, केंद्राचे शास्त्रज्ञ शैलेश देशमुख, शांताराम सोनवणे, भरत दवंगे, डॉ. विठ्ठल विखे डॉ. विलास घुले डॉ. प्रियंका खर्डे, संज्जला लांडगे, कैलास लोंढे आदींसह  प्रयोगशील शेतकरी आणि महिला उपस्थित होते. 

 कार्यक्रमाचे औचित्य साधून या निमित्ताने कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने परिसरातील  प्रयोगशील शेतकरी भागवत शेळके, राहुल कसाब, चंद्रकांत मुंढे, विनोद राऊत, वैशाली पर्वत, किशोर बेंद्रे, रोहिदास म्हस्के, अण्णासाहेब गोरे, बाळासाहेब गोरे, अनिल गागरे ,करण दळे यांचा सन्मान केंद्राच्या वतीने करण्यात आला. 

 डाॅ. उत्तमराव कदम यांनी  शेतकऱ्यांनी पिकाशी बोलले पाहिजे पिकाची गरज ओळखून यापुढे नियोजन करणे आवश्यक आहे. वेगवेगळे प्रयोग करत शेतकऱ्यांनी पुढे जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

 
 कृषी अधिकारी सागर गायकवाड आबासाहेब भोरे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देवून  फार्मर आयडी शेतकऱ्यांनी  लवकर काढून घ्यावा असे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री म्हस्के यांनी तर आभार डॉ. प्रियंका खर्डे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments