राहाता ( प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील लोणी येथे शनिवार आठ फेब्रुवारी 2025 रोजी दिवसभर डाळिंब बहार मार्गदर्शन मेळावा तसेच भव्य कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाचा व मार्गदर्शनाचा डाळिंब बागायतदार, विक्रेते तसेच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन डाळिंब रत्न श्री बी टी गोरे सर यांनी केले आहे.
बी.टी गोरे सर यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की, राहाता तालुक्यातील लोणी शिवारात लोणी ते निर्मळ पिंपरी रस्त्यावर चंद्रसखा सांस्कृतिक भवन मध्ये शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दिवसभर डाळिंब बहार मार्गदर्शन व भव्य कृषी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक वरद विनायक सेवाधामचे महंत ह भ प उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील हे भूषवणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये डाळिंब बहार मार्गदर्शनासाठी चर्चासत्र होणार आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन ,तण नाशक व्यवस्थापन ,रोग कीड व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे डाळिंब बहार तसेच डाळिंबाचे उत्पादन चांगले व्हावे, रोग ,कीड पडू नये .यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांची औषधे उपलब्ध आहेत. अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे सुमारे 50 ते 60 कंपन्यांची स्टॉल येथे राहणार असून डाळिंब बागातदार व विक्रेत्यांसाठी ही मोठी पर्वणी राहणार आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कंपन्यांची मशागतीसाठी अवजारे, ट्रॅक्टर आदी साधने या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. तरी या डाळिंब बहार मार्गदर्शन मेळावा व भव्य कृषी प्रदर्शनाचा डाळिंब बागायतदार, शेतकरी यांनी लाभ घ्यावा .असे आवाहन या डाळिंब बहार मेळाव्याचे मार्गदर्शक डाळिंब तज्ञ , कृषी तज्ञ ,बी.टी गोरे सर यांनी केले असून या कार्यक्रमासाठी संयोजक संदीप निर्मळ, सचिन शिंदे, हर्षल खांदे ,सचिन शिरसाठ, संकेत टाकसाळ ,संदीप कुर्हे,राजेंद्र मनकर ,अमोल साळुंके आदी प्रयत्नशील असून अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 97 67 63 37 77 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
0 Comments