आझाद क्रीडा मंडळ व श्रीधर गाडे मित्र मंडळ यांच्या वतीने टाकळीभान येथील पत्रकारांचा सन्मान,



टाकळीभान प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे श्रीधर गाडे मित्र मंडळ व आझाद क्रीडा मंडळ यांच्यावतीने ६ जानेवारी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. 

       प्रथमता आझाद क्रीडा मंडळाच्या वतीने हायस्कूल येथील मैदानावर आझाद क्रीडा मंडळच्या वतीने गावातील सर्व पत्रकारांचा सन्मान करून उत्कृष्ट खेळाडूंना बॅगचे पत्रकारांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी आझाद क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक रवींद्र गाढे यांनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.यावेळी अक्षय थोरात ,मुंडे पाटील, साई पवार, अशोक शेंडे, राजेंद्र जाधव व खेळाडू उपस्थित होते. 
  
      तसेच श्रीधर गाडे मित्रमंडळ यांच्यावतीने गावातील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे म्हणाले की गेल्या वीस वर्षांपासून टाकळीभान ग्रामपंचायतच्या वतीने पत्रकार दिन साजरा केला जातो, परंतु गेल्या दोन वर्षापासून सत्ताधाऱ्यांना पत्रकार दिनाचा विसर पडला आहे. या पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांच्या सन्मानाची सुरुवात आम्ही केली असून पत्रकार हा समाजाचे प्रश्न मांडणारा लोकशाहीच्या स्तंभातील महत्त्वाचा घटक असून जनतेसमोर कायम सत्य मांडण्याचा प्रयत्न करत असतो. गावच्या जडणघडणीत पत्रकारांचा मोलाचा वाटा असून देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्यांच्या सन्मानाचा विसर पडल्याबद्दल खेद वाटत आहे.या सामाजिक घटकाचा आपण नेहमी सन्मानच केला पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले. यावेळी पत्रकार अर्जुन राऊत, पत्रकार बापूसाहेब नवले यांनी पत्रकारांच्या सन्मानाबद्दल आझाद क्रीडा मंडळ व श्रीधर गाडे मित्र मंडळ यांचे आभार मानले. याप्रसंगी संत सावता सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब तनपुरे,प्रा. कार्लस साठे सर, विठोबा पवार, बंडोपंत कोकणे,अनिल कोकणे, ऍड. धनराज कोकणे, मधुकर गायकवाड, उत्तमराव दाभाडे, आबासाहेब सलालकर आदींसह पत्रकार बांधव व गावातील मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. जयकर मगर यांनी केले. आभार श्रीधर गाडे, व रवी गाढे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments