बाभळेश्वर प्रतिनिधी.
राहाता तालुक्यातील श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजुरी येथे बाल आनंद बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहारिक ज्ञानाची ही माहिती मिळावी या हेतूने बाल आनंद बाजार विद्यालयांमध्ये भरवण्यात आला. या बाल आनंद बाजारामध्ये पहिली ते दहावी च्या विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. भाजीपाल्यासह खवय्यांची दुकाने सुद्धा विद्यालयांमध्ये थाटलेली पहावयास मिळाली. या बाल आनंद बाजारामध्ये पालकांसह शिक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हा बाल आनंद बाजार यशस्वी पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
0 Comments