संगमनेरचे सत्तांतर होताच वरवंडीच्या थापलिंग रस्त्याचेकाम पूर्ण



 संगमनेर( प्रतिनिधी) तालुक्याच्या पठार भागातील वरवंडी येथील बहुचर्चित आणि दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेला थापलिंग खंडोबा देवस्थान ते शिंदोडी ठाकरवाडी रस्त्याचे काम आज अखेर पूर्ण झाल्याने येथील ग्रामस्थांकडून ‌समाधान व्यक्त होत आहे.


गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असणारा हा रस्ता अनेकदा माध्यमांचा विषय झाला होता.रस्ता पूर्ण होण्यासाठी वरवंडी गावातील ग्रामस्थांना खूप प्रयत्न करावे लागले.त्यात उपोषण आणि आत्मदहन आंदोलनाचे इशारे यामुळे हा रस्ता जास्त प्रकाश झोतात आला होता.मात्र विधानसभा आणि लोकसभेच्या आचारसंहितेचे कारणे दाखवून ह्या रस्ता कामाकडे अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले होते.त्याचवेळी यातील ठेकेदाराला काळ्या यादीत टाकुनही त्यास या कामाची साठ टक्के रक्कम देखील अदा करण्यात आली होती.
अधिकाऱ्यांनी या कामाबाबत आजपर्यंत फक्त हालगर्जीपणा केला होता त्यामुळे या रस्त्याचे काम आज पर्यंत अपूर्णच होते.परंतु संगमनेरचे सत्तांतर होताच आमदार अमोल खताळ यांनी रिपाइंचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके आणि भाजपचे गुलाब भोसले यांना हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.आणि आज अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले.लागलीच अधिकाऱ्यांनी यावेळी 
आदेश देत काम त्वरित चालू केले आणि पूर्वीच्या ठेकेदारावर कडक कारवाई करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला . 

रस्ता पूर्ण झाल्याने वरवंडीच्या ग्रामस्थांनी अतिशय समाधान व्यक्त केले.या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी रिपाईचे संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके,
भाजपचे गुलाब भोसले वरवंडी तंटामुक्ती अध्यक्ष भागवत बस्ते विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजाबापु वर्पे सचिव उल्हास गागरे डॉ.संतोष वर्पे रिपाईचे मराठा आघाडीचे तालुकाध्यक्ष गौतम वर्पे पठार भाग प्रमुख सागर शिंदे युवा विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ भोसले सुभाष गागरे राजाराम वर्पे,राज पाटोळे तुळशीराम पाटोळे,दत्तात्रय वर्पे,सुभाष पाटोळे प्रदीप भोसले,शुभंकर भोसले बाळासाहेब बकुळे पर्बत पाटोळे आदी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments