टाकळीभान (प्रतिनिधी ) श्रीरामपुर तालुक्यातील
टाकळीभान येथे आयोजीत गणित विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना .
श्रीरामपुर तालुक्याचे प्रांताधिकारी किरणजी सांवत यांनी म्हटले कि शाळेच्या प्रांगणात तारागण पहायला मिळले हेच आपल भाग्य आहे. तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शन टाकळीभान येथील न्यू इग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पा. कनिष्ठ महाविद्यालयात पार पडले .यात तालुक्यातील एकून ८७ शाळेतील विद्यार्थ्यानी २७२ उपकरण सादरीकरण केले होते. प्राथमिक शाळे पासून तर महाविद्यालया पर्यत विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोदवत आपण देशाचे भावि वैज्ञानिक आहोत असे दाखवून दिले. प्रदर्शनाचे उद्घाटन १९ रोजी तहसीलदार मिलींदकुमार वाघ अध्यक्ष स्थानी होते त्यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या कौन्सलींग सदस्या मिनाताई जगधने , पचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी सामलीटी मँडम,स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य मंजाबापू थोरात,जनरल बापुसाहेब पटारे यावेळी उपस्थितीत कार्यक्रम पारपडला. बक्षिस वितरणावेळी सांवत साहेब म्हणाले कि ज्ञान आणि विज्ञान यांच संगनमत होत त्याला संशोधन म्हणतात ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना यातून शिकायला मिळते व यिच विद्यार्थ्यातून भावी शास्रज्ञ तयार होतो त्यामुळे प्रदर्शना भेट देते वेळी आलेले उपकरण बघुन चकित झाल्याचे दिसून आहे या वेळी अटल टिंकरिंग लँब मध्येच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने पाहुण्यासाठी नावाचे किचन व श्रीणेशाची प्रतीकृती भेट म्हणून देण्यात आली.हे सर्व साहीत्य विद्यार्थ्यांना खूले करुन दिल्यामुळे प्राचार्य इंगळे सर विज्ञान शिक्षक बनकर सर यांचे विशेष कौतुक केले.
यावेळी ८७ शाळेतुन २३७ विद्यार्थी व १५ शिक्षकांचे उपकरण सादरीकरण केले होते.यावेळी तालुक्यातील ३०० शाळेनी आपले विद्यार्थी घेऊन प्रदर्शनास भेटी दिल्या यात सर्वात आकर्षण ठरलेले पोलाद स्टील कंपनीचे तारांगण व्ह्यानने सर्वाचे लक्ष वेधुन घेतले होते त्यासाठीप्रशांत पडीत व समर्थ ढोकचौळे यांनी परीश्रम घेतले
यावेळी विज्ञान प्रदर्शनचे तालुकाध्यक्ष सर्व सदस्य व शिक्षक वर्ग व शाळेचे प्राचार्य बी टी इंगळे सर , व पर्यवेक्षक बनसोडे सर व शिक्षक, शिक्षीका मुले यांनी सर्वानी योग्य नियोजन करत उत्तम रीत्या कार्यक्रम पार पाडला.
.
0 Comments