महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री अहिल्यानगर जिल्ह्यात! शिर्डी विमानतळ व अहिल्यानगर मध्ये जोरदार स्वागत!ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी केला त्यांचा केला सत्कार!

शिर्डी ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच  रविवारी अहिल्यानगर जिल्ह्यात आले‌  होते .ते शिर्डी  विमानतळावर काल रविवारी आले असता. शिर्डी विमानतळावर उतल्यानंतर  त्यांचे शिर्डी विमानतळावर शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर ‌यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका लग्न समारंभासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात आले होते.

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पाडल्यानंतर मंत्रिमंडळ जाहीर झाले. त्यानंतर शनिवारी मंत्र्यांना खाते वाटप  जाहीर झाले . आणि 22डिसेंबर 24 रोजी रविवारी मुख्यमंत्री विमानाने शिर्डी विमानतळावर आले .ते  शिर्डीतूनअहिल्यानगर कडे एका लग्न समारंभासाठी रवाना झाले होते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत  विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे होते. जलसंपदा  मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. 
अहिल्यानगर येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. अण्णा हजारे यांना समाजसेवेसाठी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे अशी सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी आमदार संग्राम जगताप, शिवाजीराव कर्डिले, काशिनाथ दाते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे आदी उपस्थित होते. पोपटराव पवार यांच्या कुटुंबातील या लग्नाला उपस्थित होते. तेथे वधू वरंबरोबर फोटो काढून त्यांनी वधूवरांना आशीर्वाद दिले. त्यानंतर मुख्यमंत्री परत शिर्डीला येऊन विमानाने मुंबईकडे रवाना झाले.

Post a Comment

0 Comments