विदेशी पाहुण्यांनी घेतले टाकळीभानच्या महादेव मंदीराचे दर्शन.

टाकळीभान(प्रतिनिधी)—श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री शंभो महादेवाच्या दर्शनासाठी विदेशी पाहुण्यांनी हजेरी लावली.

 महादेव मंदीर व परिसरातील सुशोभीकरणाने व स्वच्छतेने विदेशी पाहुण्यांच्या मनाला भुरळ घातली.
टाकळीभान येथील व सध्या पुणे येथे स्थायीक असलेले आयुर्वेदचे डाॅक्टर निसार शेख यांच्याकडे उपचारासाठी विदेशी पाहुणे आले होते. यामध्ये बल्गेरिया योग फेडरेशनचे प्रेसिडेंट व्हेरा झहरएवा, मिरोस्लावा वलादिमिरोवा, स्लाव्यांका मारियान, व्हारा हे सर्व युरोप खंडातील देश बल्गेरिया येथून आले होते. यावेळी डाॅ.निसार शेख यांनी या सर्व विदेशी पाहुण्यांना सोबत घेवून देवगड दर्शन व टाकळीभान येथील पुरातन असलेले महादेव मंदीराचे दर्शन घडविले. याप्रसंगी रामभाऊ आरगडे, बापूसाहेब नवले, पकंज पटारे, भाजपाचे श्रीकृष्ण वेताळ, दत्तात्रय कदम, आदी उपस्थित होते. श्री क्षेत्र देवगड व महादेव दर्शनाने सर्व विदेशी पाहुणे भारावून गेले. गुरूवर्य ह.भ.प.भास्करगिरीजी महाराज यांचेही दर्शन यावेळी उपस्थितांना झाले. तद्नंतर बेलापूर येथील केशव गोविंद बनाला भेट देवून पुढील प्रवासासाठी ते मार्गस्थ झाले.

Post a Comment

0 Comments