महायुतीच्या खाते वाटपात शिर्डीचे ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंधारण खाते!

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी विधानसभा मतदारसंघातून  सातव्यांदा विधानसभेवर निवडून आलेले आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे) हे कॅबिनेट मंत्री पदाचे खाते मिळाले आहे.


  राधाकृष्ण विखे पाटील हे मागील मंत्रिमंडळात महसूल मंत्री होते. मात्र महसूल खाते यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले असून महत्त्वाचे जल साधारण खाते राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळाले आहे. स्व. डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील हे नेहमीच राज्यातील पाणी प्रश्नाबद्दल लढा देणारे एक व्यक्तिमत्त्व होते. स्वर्गीय डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांचे  पश्चिमेला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे त्यांचे स्वप्न होते व ते आता नक्कीच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण होईल. राज्यातील शेती पाणी प्रश्न महत्त्वाचा असून तो सोडवण्यासाठी नक्कीच राज्याला राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून फायदा होणार आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments