साईंचा आशीर्वाद व जनतेचा निर्धारच माझ्या विजयाला कारणीभूत! एकनाथराव शिंदे यांची तब्येत लवकर बरी होऊ दे व संगमनेरात जास्तीत जास्त सेवा, विकास करण्याची संधी व शक्ती दे !अशी साईचरणी केली प्रार्थना--आमदार अमोल खताळ

शिर्डी ( राजकुमार गडकरी) आपण निस्सिम साईभक्त असून अनेक वेळा सामान्य साईभक्त म्हणून शिर्डीला येऊन साई दर्शन घेतले आहे.

या निवडणुकीच्या निकाला अगोदरही दोन दिवसा पूर्वी  साईदर्शन घेऊन गेलो होतो. मनात  धाकधूक होती. मात्र साई दर्शनाने आत्मविश्वास वाढला.व  साईंचा आशीर्वादच माझ्या विजयाला कारणीभूत ठरला. असं मत संगमनेर विधानसभा मतदारसंघातील  जॉईंट किलर समजले जाणारे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केले.
आमदार अमोल खताळ आपल्या परिवारासह रविवारी शिर्डीत येऊन त्यांनी श्री साईबाबांचे दर्शन घेतले. आमदार अमोल खताळ यांनी डोक्यात भगवी टोपी घातलेली होती. अमोल खताळ शिर्डीत येताच त्यांना अनेकांनी हात हलवून ,प्रत्यक्ष गळाभेट घेऊन,हस्तांदोलन करत त्यांचे अभिनंदन केले. मंदिरात जाऊन त्यांनी साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर मंदिर प्रमुख विष्णू थोरात यांनी अमोल खताळ यांचा साईसंस्थांनच्या वतीने सत्कार केला. 
आमदार अमोल खताळ यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, निवडून आल्यानंतर परत शिर्डीला साई दर्शनला येण्याची खूप इच्छा होती व आज रविवारी साईंचा आशीर्वाद घेण्यासाठी शिर्डीत आलो. माझ्या विजयाला साईंचाच आशीर्वाद कारणीभूत आहे. आपल्या व्यवसायालाही साईंचेच नाव आहे व घरातून बाहेर पडतानाही साईंचे दर्शन व नाव घेऊनच बाहेर पडतो. असे सांगत निवडणुकीच्या वेळी एका कार्यकर्त्यांनी मला हि भगवी टोपी दिली .हीच भगवी टोपी आता माझी ओळख झाली आहे.
ती मी कायम घालत  आहे. याच भगव्या टोपीने मोठा इतिहास केला आहे. गेली 40 वर्षे सत्ता असणाऱ्यांच्या दहशतीखाली संगमनेर तालुका होता .वाड्या वस्त्यांवर त्यांची दहशत होती. त्यामुळेच निवडणुकीत आपण भय मुक्तीचा नारा दिला होता व हा भयमुक्तीचा नारा व जनतेने केलेला निर्धार यामुळे येथे 40 वर्षाची सत्ता पलटली आहे.
आपण संगमनेरचे आमदार झालो असलो तरी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहोत .संगमनेर तालुका सुजलाम सुफलाम राहावा, व येणाऱ्या कालावधीत येथील जनतेची जास्तीत जास्त सेवा करण्याची संधी मिळावी त्यासाठी साईंचा आशीर्वाद घेतला आहे. तसेच आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची तब्येत चांगली व्हावी .ते लवकर बरे व्हावेत. यासाठी साईंना प्रार्थना केली आहे. असे सांगत संगमनेर मतदारसंघात रोजगार, आरोग्य ,रस्ते आदी प्रश्नाला प्रथम आपले प्राधान्य राहणार असून साकुर पठार भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा आपला पहिला प्रयत्न राहणार आहे. आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस , अजित दादा पवार आदींना आपण भेटलो आहे .संगमनेरच्या विकासासाठी मला  मोठी साथ देण्याचा व मोठा निधी  देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच आमचे दैवता सारखे असणारे आमदार राधाकृष्ण विखे पाटील ,डॉक्टर सुजय विखे पाटील व सौ शालिनीताई विखे पाटील यांनी तर मला यापूर्वी कधी काही कमी पडू दिलं नाही. सामान्य कार्यकर्त्याला राजकारणात सन्मान कसा दिला जातो हेच विखे परिवाराकडून त्यातून पाहायला मिळतं. असं सांगत मंत्री पदाबाबत आपल्या नावाची चर्चा होत आहे. असे विचारताच असं ऐकून मनाला समाधान वाटतं, असं सांगत आपण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार आहोत. पक्ष जो विश्वास टाकेल त्याप्रमाणे आपण काम करत राहणार आहोत. असे म्हणत विरोधक मताधिक्य मिळाले तर ईव्हीएम मशीन चांगलं आणि पराभव झाला तर ईव्हीएम मशीनला दोषी ठरवलं जात आहे. निवडणुकीत हार जीत होत असते. मात्र हार झाल्यानंतर मोठ्या मनाने हार मान्य केली पाहिजे .असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments