टाकळीभान प्रतिनिधी -श्रीरामपुर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या टाकळीभान ग्रामपंचायतीच्या काल ३० नोहेंबर रोजी आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेचा ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांनाही विसर पडल्याने केवळ पञकारांनीच ग्रामपंचायत कार्यालयाकडे खेटया मारल्या. ग्रामविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आसता ते ही नाँट रिचेबल आसल्याचे दिसुन आले. त्यामुळे केवळ कागदी मेळ घालण्यासाठी ग्रामसभा बोलावली कि काय ? असा संशय व्यक्त केला जात आहे.
टाकळीभान ग्रामपंचायतीने अंदाजपञक तयार करण्यासाठी काल ३० नोहेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे सकाळी १०.३० वाजता आयोजन केले होते. ग्रामस्थांच्या माहीतीसाठी २५ नोहेंबर रोजी ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर ग्रामस्थांना माहीती देण्यात आली होती. तर सदस्यांनाही या बाबत अजेंडा देण्यात आलेला आहे. माञ दुपारी १३.३० पर्यंतही पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ यापैकि कोणीही ग्रामपंचायत कार्यालयाकडे फिरकले नाही. पञकार माञ ग्रामपंचायत कार्यालयाकडे हेलपाटे मारुन वैतागुन गेले. शेवटी ग्रामविकास अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आसता ते नाॕट रिचेबल आसल्याचे दिसुन आले तृर सरपंच यांच्याशी संपृर्क साधला आसता ते बाहेरगावी आसल्याची माहीती मिळाली.
गेल्या वर्षभरापासुन सदस्यांच्या मासिक बैठकितही सरपंच, उपसरपंच व एखादा सदस्य उपस्थित राहुन कामकाजात भाग घेत आसल्याचे दिसुन आल्याने उर्वरीत सदस्य गावगाड्याच्या कामकाजात अत्यंत उदासिन आसल्याचे अनेकदा पहावयास मिळाले आहे. ग्रामस्थांचे हक्काचे व्यासपिठ आसलेल्या ग्रामसभे बाबतही तोच पाढा गिवरला जात आसल्याने केवळ कागदी मेळ घालण्यासाठी ग्रामसभेचा व मासिक बैठकिचा फार्स केला जात आसल्याचे उघड झाले आहे.
0 Comments