शिर्डी (राजकुमार गडकरी)
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. त्यामुळेच विरोधक ईव्हीएम मशीन बद्दल बोलून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत व महायुतीला मिळालेल्या बहुमताला एक प्रकारे गालबोट लावण्याचे काम करत असून विरोधकांनी खरंतर आपला पराभव झाला याचं प्रथम आत्मपरीक्षण करावं ,असं मत राज्याचे माजी मुख्यमंत्री व भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
अशोकराव चव्हाण हे आपल्या संपूर्ण परिवारासह शुक्रवारी शिर्डीत आले .त्यांनी मंदिरात जाऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर साई संस्थांनच्या वतीने त्यांचा मंदिर प्रमुख विष्णू थोरात व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी श्री साई मूर्ती व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
अशोकराव चव्हाण पत्रकारांशी यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, आपण निवडणुक झाल्या म्हणून शिर्डीला आलो नाही तर आपण व संपूर्ण कुटुंब पूर्वीपासून साईभक्त आहे. कोणत्याही शुभ कार्य किंवा काम असो बाबांचा आशीर्वाद घेऊनच ते सुरू करतो. बाबा आमचे खरे गुरु आहेत. असे सांगत आपली कन्या आ. श्रीजया चव्हाण भोकर या मतदारसंघातून निवडून आली. ती बाबांच्या आशीर्वादामुळेच आली म्हणून आम्ही सर्व परिवार साई दर्शनाला आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की ,तिन्ही पक्षांचे महायुती सरकार आहे .त्यामुळे या तिन्ही पक्ष्यांच्या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चर्चा झाली आहे. बरेच प्रश्न मार्गी लागले असून आता औपचारिकता बाकी आहे .पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य राहील असे त्यांनी म्हणत काँग्रेसचा प्रमुख असताना काँग्रेसच्या 82 जागा होत्या. त्यानंतर पृथ्वीराज बाबा चव्हाण आले त्यावेळी 42 झाल्या आणि आता तर नाना पटोलेंच्या काळात काँग्रेस सोळावर आली आहे, अशी काँग्रेसची दैनंदिन अवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांनी प्रथम आत्मपरीक्षण करावं. मला कोणाला सल्ला द्यायचा नाही कारण तिकडे जाणकार, लोकप्रिय असे नेते आहेत. असे सांगत मीही एक मनुष्य आहे. मलाही भावना आहे .14 वर्षे वनवास भोगला आहे. म्हणूनच आपण भाजपात जाण्याचा योग्य तो निर्णय घेतला. माझा कोणावर आकस नाही व विनाकारण कोणावर टीका करणे मला आवडत नाही. कारण आपण बाबांचे भक्त आहोत. मात्र सध्या ईव्हीएम बद्दल जे विरोधकांकडून बोललं जातं ते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे. सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम बद्दल चांगला निर्णय दिला आहे. तो ग्राह्य मानला पाहिजे. तेलंगणा, कर्नाटकात काँग्रेस आली तेव्हा ईव्हीएम बद्दल कोणी बोललं नाही. मात्र आत्ताच महायुतीला बहुमत मिळालं त्यामुळे ईव्हीएम चे नाव करून महायुतीच्या मिळालेल्या बहुमताला बदनाम करण्याचं काम विरोधकांकडून होत आहे. असं सांगत एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भोगलं, ते मनुष्यच आहेत. मुख्यमंत्रीपद जात असताना थोडं मनाला वाईट वाटतं ,मात्र तरीही एकनाथ शिंदे यांनी मोठ्या मनाने निर्णय घेतला आहे व आपला मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही अडथळा नाही असं जाहीर केलं आहे. त्यामुळे महायुतीचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य राहील असं सांगत महायुतीच्या नेत्यांमध्ये कोण मुख्यमंत्री होईल उपमुख्यमंत्री होईल किंवा कोणाला कोणती मंत्रिपदे मिळतील हे संजय राऊत यांनी त्यावर भाष्य करण्यापेक्षा आपल्या पक्षाला किती जागा मिळाल्या याचा प्रथम विचार करावा. मात्र ते त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते आहेत त्यामुळे ते नेहमी बोलत असतात. असा टोमणाही यावेळी अशोकराव चव्हाण यांनी संजय राऊत यांना मारला. मराठवाड्याला किती मंत्रीपद मिळतील यावर बोलताना अशोकराव चव्हाण म्हणाले की, तो निर्णय वरिष्ठ घेत असतात व संख्याबळ लक्षात घेऊन तो निर्णय होत असतो. पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे दिग्गज नेते पराभूत झाले .याबद्दल विचारताच माणूस जास्त दिवस सत्तेत किंवा पदावर काम करत असला तर जनतेत एक निगेटिव्ह वातावरण हळूहळू होत असते. तसं तेथे झाले असेल. असं सांगत सन 2029 चा विचार विरोधक करत आहेत. काँग्रेस करत आहे. मात्र सन 2029 मध्येही ते जिंकून येणार नाहीत. हे त्यांना समजलं आहे. म्हणूनच ते तसं बोलत असतील.निवडणुकीत दोघांनाही संधी मिळते. लोकांनी आम्हाला पसंती दिली आहे तसेच 2029 ला ही आम्हालाच पसंती मिळेल त्यामुळे काँग्रेसने 2029 चा विचार करू नये .असे यावेळी अशोकराव चव्हाण यांनी म्हटले. यावेळी त्यांचा संपूर्ण परिवार तसेच कार्यकर्तेही उपस्थित होते.
0 Comments