शिर्डी (प्रतिनिधी) नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय मानव सुरक्षा अधिकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा महत्त्वाचा व मानाचा आंतरराष्ट्रीय मानव सेवा रत्न पुरस्कार नुकताच राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील बाबासाहेब उर्फ रोहित अंकुश बोर्डे यांना नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला असून पुरस्कार प्राप्त रोहित अंकुश बोर्डे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आंतरराष्ट्रीय मानव सुरक्षा अधिकार परिषद नवी दिल्ली ही ह्यूमन राईट संदर्भात भारतात व भारताबरोबरच यूएसए, पॅलेस्टीन, इंग्लंड आदी अन्य देशातही मोठे काम करत आहे. या आंतरराष्ट्रीय मानव सुरक्षा अधिकार परिषदेचे चेअरमन डॉक्टर दीपक मित्तल, व संस्थापक संचालक डॉक्टर टी एम ओंकार सर, श्री हर्षलजी, डॉक्टर शमवेल साखरपेरेकर(पुणे) यांच्यासह विविध देश विदेशातील पदाधिकारी हे ह्युमन राईट व आंतरराष्ट्रीय मानव सुरक्षा अधिकारा संदर्भात देश-विदेशात काम करत आहेत. प्रत्येक व्यक्तीला ह्युमन राईट संदर्भात जागृत करणे, महिला अत्याचारा विरोधात लढणे, पर्यावरण, कन्या भ्रूणहत्या या संदर्भात आवाज उठवणे, पिडीतांना मदत करणे, पोलिसांना सहकार्य करणे ,एड्स विरोधात जनजागृती करणे ,अशा अनेक गोष्टी संदर्भात ही संघटना काम करत असून प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक प्रभाव टाकण्यासाठी ही संघटना
अहोरात्र देश-विदेशात झटत असते. या आंतरराष्ट्रीय मानव सुरक्षा अधिकार परिषदेचे मोठे काम देश-विदेशात सुरू आहे. अशा या आंतरराष्ट्रीय मानव सुरक्षा अधिकार परिषदेच्या वतीने देश-विदेशात ह्युमन राइट्स संदर्भात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय मानस सेवा रत्न पुरस्कार दिला जातो .असा हा महत्त्वाचा व मानाचा आंतराष्ट्रीय मानव सेवा रत्न पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी जवळील सावळीविहीर बुद्रुक येथील ग्रामीण भागातील पण या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या रोहित अंकुश बोर्डे यांना नुकताच नवी दिल्ली येथे उपस्थित संघटनेचे चेअरमन डॉक्टर दीपक मित्तल, तसेच डॉक्टर टी एम ओंकार सर तसेच हर्षलजी, डॉक्टर शमवेल साखरपेरेकर यांच्या तसेच प्रमुख अतिथी म्हणून असणारे जैन साहेब यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सुंदर व भव्य असे स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र यावेळी देण्यात आले.यावेळी बाबासाहेब उर्फ रोहित अंकुश बोर्डे यांच्या पत्नी मनीषा बोर्डे ही यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार दिल्यानंतर पुरस्कार कर्त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. रोहित अंकुश बोर्डे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सावळीविहीर व परिसरासह विविध ठिकाणी त्यांचे अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर बाबासाहेब उर्फ रोहित अंकुश बोर्डे यांनी बोलताना सांगितले की, हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मला मोठा आनंद व समाधान होत आहे .आंतरराष्ट्रीय असा हा पुरस्कार असून ह्यूमन राईट संदर्भात आपल्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय मानव सुरक्षा अधिकार परिषद या संघटनेने दिल्याबद्दल आणखीनच आनंद होत आहे. या पुरस्कारामुळे आणखी आपली जबाबदारी वाढली असून आपण यापुढेही ह्यूमन राइट्स संदर्भात सोशल वर्कर म्हणून अधिक चांगले काम करणार असून इतरांनाही या कार्यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. असे ते यावेळी म्हणाले व हा पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी आंतरराष्ट्रीय मानव सुरक्षा अधिकार परिषद चे सर्व पदाधिकारी तसेच पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनंदन व सत्कार करणाऱ्या सर्वांचे धन्यवाद मानले आहेत.
0 Comments