शिर्डी (प्रतिनिधी) गुरुवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२४ रोजी नविन दर्शन रांग संकुलातील सशुल्क दर्शनपास काऊंटर येथे साईभक्तांकरीता जनसंपर्क विभागाअंतर्गत सुरु करणेत आलेल्या आरती व दर्शन पास वितरण प्रणालीमध्ये डिजिटल पेमेंट सुविधेचे (कार्ड / UPI) उद्घाटन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री साईबाबा संस्थानचे प्र. उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे, विश्वनाथ बजाज, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, प्र. विभाग प्रमुख अनिल शिंदे, प्रविण मिरजकर, विजय मते, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वप्निल गायकवाड, आय. टी. विभागाचे संजय गिरमे व TCS कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
शिर्डी मध्ये साई दर्शनासाठी अत्याधुनिक व सर्व सोयी सुविधायुक्त अशी दर्शन रांग बनवण्यात आली आहे. या दर्शन रांग संकुलामध्ये साई भक्तांना श्री साईबाबांच्या सर्व आरत्या व साईबाबांच्या दर्शनासाठी संस्थांनमार्फत आरती व दर्शन पास घेण्याच्या वेळी डिजिटल पेमेंट करण्यासाठी जी सुविधा उपलब्ध असते ती सुविधा येथे आता उपलब्ध होणार आहे. त्याचा साई भक्तांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे साई भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.
0 Comments