बाभळेश्वर येथे संविधान दिन उत्साहात साजरा




बाभळेश्वर (वार्ताहर) विविध धर्म, संप्रदाय भाषा चालीरीती असतानाही सर्वांमध्ये एकात्मता उत्पन्न करणारे असे देशाचे संविधान आहे. या संविधानाने आपल्या देशात अद्वितीयरीतीने लोकशाही मुल्ये दृढ केले आहेत. म्हणून त्याचे आपल्या जीवनात महत्व आहे. त्यामुळेच   राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे समस्थ ग्रामस्थ व जेष्ठ नागरिकांच्या वतीने नुकताच संविधान दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणात पार पडला.

               छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच संविधान पुस्तीकेस पुष्पहार अर्पण करून सुरु झालेल्या या समारंभात सुरुवातीला सर्व उपस्थित नागरिकांनी संविधानाची उद्देशिका सामुदायिक म्हटली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राहाता येथील दिवाणी न्यायाधीश श्रीमती ए.ए. कुलकर्णी या होत्या. राहाता न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश वाय.एच. अमेठा, अॅड. शाम डांगे, अॅड. काका गोरे, जेष्ठ नागरिक तानाजी बेंद्रे, डॉ.वैशाली म्हस्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
               याप्रसंगी राहाता वकील संघाचे अध्यक्ष विलास ब्राम्हणे, गटशिक्षणाधिकारी श्री.पावसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती तुकाराम बेंद्रे, अॅड.भास्कर पठारे, सरपंच सौ.संगीता शिंदे, शंकर बेंद्रे, डॉ.विखे पाटील महाविद्यालायचे प्राचार्य डेंगळे सर, अॅड.प्रकाश बेंद्रे, प्रा.डॉ.अनिल बेंद्रे, भारतीय जनता पार्टीचे रवी बेंद्रे, रयतचे विभागीय निरीक्षक प्रमोद तोरणे, माहिती अधिकार कार्यकर्ते गोरखदादा गवारे, संतोष थेटे, नदीम शेख, नितीन रोकडे, सौ.माधुरी रकटे, शिवा गोसावी, प्रकाश गागरे, राहुल डावखर, शंकर रोकडे, सुहास बेंद्रे, तुकाराम शंकर बेंद्रे, विष्णू कोकाटे, शरद धनवे, प्रसाद बेंद्रे, शोभा म्हस्के, सुरज म्हस्के, जिल्हा परिषद शाळेचे श्री.दहिफळे सर, कोरडे सर, प्रभाकर बेंद्रे सर, प्रल्हाद बेंद्रे सर, बोटलावार मॅडम, बनसोडे मॅडम, कदम मॅडम, कुसमुडे मॅडम, मुंडलिक मॅडम आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments