राज्यात गेले अडीच वर्षे चांगले निर्णय झाले, तसेच निर्णय पुढेही होतील त्यासाठी‌ साई नक्कीच महायुती सरकारला शक्ती देतील--शिवसेना( शिंदे गटाचे) नेते रामदास कदमरामदास कदम यांनी सहपरिवार घेतले शिर्डीत साईबाबांचे दर्शन!

शिर्डी ( प्रतिनिधी) साईबाबांनी महायुतीला चांगला कौल दिला आहे . एक-दोन दिवसात महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येईल. अडीच वर्ष महायुतीने चांगले काम केले. असेच काम यापुढेही महाराष्ट्रात सरकारकडून होण्यासाठी शक्ती दे !चांगले निर्णय  या पुढेही होऊ दे, असे आपण साई चरणी साकडे घातल्याचेही शिंदे शिवसेना गटाचे नेते रामदास कदम यांनी शिर्डीत सांगितले.
रामदास कदम यांनी आपल्या परिवारासह शिर्डीला भेट घेऊन साईबाबांचे दर्शन घेतले.
यावेळी रामदास कदम पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आपण साईबाबांचा भक्त, सेवक आहे. 52 वर्षापासून शिर्डीला येत आहे .बाबा सातत्याने बोलावतात व आपण साई दर्शनाला येतो .असे सांगत साईबाबांनी महायुतीला चांगला कौल दिला आहे. राज्यात  महायुतीचे सरकार दोन दिवसात स्थापन होईल. गेली अडीच वर्ष सरकारने चांगली कामे केली चांगले निर्णय घेतले. यापुढे चांगले निर्णय घेतले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह राज्याला कोट्यावधीचा निधी देतील व महाराष्ट्राचा नक्कीच विकास होईल. असे सांगत लाडकी बहीण योजना तसेच इतर योजना जनतेपर्यंत पोहोचल्या. अडीच वर्षात चांगले निर्णय झाले.मुख्यमंत्री शिंदे यांनीही 18 ते 20 तास काम केले. अहोरात्र काम करणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे आहेत. असे सांगत महायुतीमध्ये भाजपा ,अजित पवार चे राष्ट्रवादी तसेच एकनाथ शिंदे ची शिवसेना आहे. प्रत्येकाला वाटतं आपलं मुख्यमंत्री व्हावा, परंतु भाजपाचे जास्त आमदार निवडून आले आहेत. 
त्यामुळे साहजिकच भाजपाचे तसेच वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील, त्यासाठी महायुतीत कोणतेही मतभेद नसतील. असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले . विरोधक लोकसभेत यश मिळाले तर ईव्हीएम मशीन बाबत काही बोलले नाही. मात्र विधानसभेत हार झाल्यानंतर आपले अपयश झाकण्यासाठी ईव्हीएम मशीनला दोष देत आहेत. हा निव्वळ महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. असे सांगत संजय राऊत साहेबांनी यापुढे तरी चांगलं बोलावं असं मला वाटतं. असं त्यांनी सांगितलं.यावेळी शिंदे शिवसेना गटाचे कार्यकर्ते ही उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments