शिर्डी( राजकुमार गडकरी)
विधानसभा निवडणुकीनंतर विरोधक ईव्हीएम मशीन बाबत जे बोलत आहे. हा निव्वळ विरोधकांचा भाबडेपणा आहे.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांना यश मिळाले त्यावेळी आम्ही कधीही ईव्हीएम मशीन बद्दल बोललो नाही. मग विधानसभेत हार झाल्यानंतर आता त्यांना ईव्हीएम मशीन कसे दिसू लागलेत.
असा उपरोधिक टोला विरोधकांना मारत पराभव हा मोठ्या मनाने मान्य करावा लागतो.
तो त्यांनी मान्य केला पाहिजे .असे मत परळी वैजनाथ मधून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
धनंजय मुंडे यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा साई संस्थांनच्या वतीने धनंजय मुंडे यांचा साई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी तथा प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले यांनी श्री साई मूर्ती व शाल देऊन सत्कार करण्यात केला.
यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.यावेळी धनंजय मुंडे पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले की, आपण निवडणुकीच्या अगोदर व विधानसभा निवडणूक झाल्यावर शिर्डीत साई दर्शनाला आलो. परळी वैजनाथ येथून माझ्यावर जनतेने तसेच राज्यातील जनतेने महायुतीवर मोठे प्रेम केले त्यामुळेच मनातील श्रद्धेपोटी येथे येऊन साई दर्शन घेऊन श्री साईबाबांकडे कायम जनसेवेचे सामर्थ्य ,बळ व सद्वविवेक बुद्धी द्यावी असा आशीर्वाद मागितला. असे धनंजय मुंडे यांनी सांगत लोकसभेत विरोधकांना यश मिळाल्यानंतर मतदान यंत्रमशीन बाबत कोणी बोलले नाही .मात्र विधानसभेत हार झाल्यानंतर ईव्हीएम मशीन बाबत विरोधक उलट सुलट बोलत आहेत. मात्र हा त्यांचा निव्वळ भाबडेपणा आहे. असे सांगत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच मंत्री पदेही महायुतीचे वरिष्ठ नेतेच ठरवतील व तो सर्वांना मान्य राहील. असे सांगत सन 2029 मध्ये शिवसेना व राष्ट्रवादी संपेल असे काँग्रेस नेते बोलल्याचे समजताच त्यांनी काँग्रेसची आज अवस्था काय झाली आहे, राज्यातील मायबाप जनतेने त्यांना धडा शिकवला आहे ना? त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी राहिलेली लाज राखावी, सन 20 29 चा विषय नंतर पहावा, असा टोलाही यावेळी त्यांनी काँग्रेसला लगावला. सकाळी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो ते काही महत्त्वाचे विषय व राजकीय काही चर्चा होती त्या निमित्ताने भेटलो ,तसे आम्ही नेहमीच भेटत असतो .असे त्यांनी एका प्रश्नावर खुलासा करताना सांगितले.
0 Comments