शिर्डी (प्रतिनिधी) मंगळवार दि.26 नोव्हेंबर रोजी भारताचा संविधान दिन देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दि.26 नोव्हेंबर हा संविधान दिन असल्यामुळे राहता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक येथेही मोठ्या उत्साहात हा संविधान दिन विविध कार्यक्रमानी दरवर्षी साजरा होत असतो . यावर्षीही 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून सावळीविहिर बुद्रुक गावात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सावळीविहीर बुद्रुक येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून विधिवत पूजन करण्यात आले.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करण्यात आला.सावळीविहीर बु"जिल्हा परिषद शाळे जवळील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकतील डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यास भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने. पो.पा.सुरेश वाघमारे. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जपे , प्रमोद कोपरे यांनी पुष्पहार अर्पण करुन एकता तरुण मंडळाच्या वतीने मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून सामुदायीक वंदना घेण्यात आली. त्रिशरण पंचशिल भिमस्मरण व भिमस्तुती घेऊन बौध्दाचार्य गौतम गोडगे यांनी भारतीय संविधान प्रास्थाविक ऊद्देशिकाचे वाचन करुन सामुदायीक अभिवादन करण्यात आले. यावेळी आखील सरपंच महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब जपे. माजी सरपंच सोपानराव पवार,लुंबिनी बुध्द विहार कमिटीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते पप्पूभाऊ वाघमारे, आकाश वाघमारे, मनोज वाघमारे,मंगेश साळवे, बौध्दाचार्य गौतम गोडगे, लक्ष्मण बनसोडे, प्रदीप नितनवरे,विनायक वाघमारे,गोकुळ पवार,सतिष भालेराव, पप्पू वाघमारे, भास्कर वाघमारे ,विनायक वाघमारे, रतन गोडगे, आशिष आगलावे,मारुती कापसे पा.आणि महिला जयश्री गोडगे,लोखंडे मावशी,मालनबाई गोडगे, रामा वाघमारे, रवी वाघमारे,लक्ष्मीबाई डोखे, हिराबाई जाधव, कोपरे मावशी,कांताबाई,निकमताई, वाघमारे व पवार परिवार व युवक युवती, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments