भरती करत असताना अपयशाला खचून जाता कामा नये- सागर खालकर,


      


 टाकळीभान (प्रतिनिधी-)
 सोहेल दारूवाला, यांच्या मार्गदर्शनाखाली  उम्मती अभ्यासिका &व साई योद्धा करिअर अकॅडमी श्रीरामपूर. च्या संयुक्त विद्यमाने  श्रीरामपूर शहरातील पोलिस & आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या मुलामुलींसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 
    यावेळी संगमनेर एस के फिटनेस क्लबचे चे संचालक सागर खालकर यांनी  मुला मुलींना  भरती बद्दल विशेष  मार्गदर्शन केले , तेव्हा ते म्हणाले , भरती करत असताना आपल्याला अनेक अडचणी येतात , अनेक वेळा अपयश येते . अपयशाने खचून न जाता ,त्या सर्व अडचणींना न जुमानता आपण निरंतर कष्ट करत राहील पाहिजे , योग्य ट्रेनिंग , जिद्द चिकाटी आणि, कष्टाच्या जोरावर यश मिळवता येते. पुढे त्यांनी ,  शारीरिक चाचणीची तयारी करताना  महत्त्वाचे नियम सकस आहाराबद्दल  माहिती दिली.
या वेळी, राष्ट्र सह्याद्रीचे व्यवस्थापकीय संपादक प्रदीप अहेर यांनी मुलांना , अभ्यासाबद्दल महत्त्वाचे  मार्गदर्शन केलं. व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. 
अझहर पटेल यांचे देखील मुलांना मार्गदर्शन लाभले. 
 यावेळी उंमती अभ्यासिका संचालक - शुभम जाधव
साई योद्धा करिअर अकॅडमी चे संचालक - आकाश शिरसाटओम समोसा चे मालक रोहित पवार, 
पुणे यूनिवर्सिटी क्रिकेट खेळाडू - इम्रान मलिक प्रशांत बोंबले , राजू फंड , प्रणित परतरे, राहुल गीते उपस्थिती होते , 
     तसेच , सोनल राठी , भाग्यश्री पवार , गौरी जगताप,  जयश्री धनवटे , अजय वायकर , असीम पठाण, गणेश गायकवाड , शुभम देवकर , ओम म्हैसमाळ , जिशाण शेख, बाळासाहेब खंडागळे , शुभम हिरे , व मोठ्या संख्येने विद्यार्थी  उपस्थिती होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश शिरसाठ यांनी केले,

Post a Comment

0 Comments