संगमनेर (सत्तेचा महासंग्राम न्युज)
ख्रिस्ती विकास परिषदेचा उपक्रम ठरला कौतुकास्पद
संगमनेर-- विधानसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने संगमनेर बस स्थानक परिसरात पक्षीहचिन्हांबाबत मतदारांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात आले.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षीय चिन्हांची विभागणी झाल्यामुळे मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाल्याची दिसून आले त्यामुळे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष चिन्हाबाबत मतदारांना योग्य माहिती होऊन जात धर्म बाजूला ठेवून पारदर्शकपणे विकासाच्या मुद्द्यावर शंभर टक्के मतदान व्हावे हा या जनजागृती अभियानाचा मुख्य उद्देश आहे
कुठल्याही पक्षाचा बोलबाला न करता स्वच्छ व पारदर्शकपणे निवडणूक पार पडावी तर विविध पक्षांच्या चिन्हाबाबत जागृत राहून मतदारांमध्ये असलेला संभ्रम दूर व्हावा म्हणून महाराष्ट्रा अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेने सेंट मेरी धर्मग्राम प्रमुख फादर ज्यो गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
या अभियानामध्ये महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, प्रा. बाबा खरात, प्रभाकर चांदेकर, लाजारस केदारी, अनुप कदम, भाऊसाहेब नेटके, प्रवीण रोहम, दिनकर यादव, विलास शेळके, श्रीधर भोसले, आसिफ शेख, सादिक तांबोळी, प्रकाश भोसले, स्वच्छता दूत आदित्य घाटगे, भाऊसाहेब वैद्य, अफसर तांबोळी, तौसीफ मणियार, राजू शेलार, विजय शेळके, नितेश शहाणे, कारभारी देव्हारे, सिमोन रूपटक्के, संजय कदम आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments