शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी मतदारसंघातील लोणी बु! लोहगाव व शिर्डी आदर्श मतदार संघ.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले असून 1355 मतदान कर्मचारी व 800 सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिर्डीतील 108 ठिकाणी असलेल्या 271 मतदान केंद्रासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे चारशे पोलीस कर्मचारी व 400 केंद्रीय सशस्त्र सुरक्षा बल या कर्मचाऱ्यांची सुरक्षा व्यवस्था कामे नियुक्ती करण्यात आली आहे .19 नोव्हेंबर रोजी राहता येथील तहसील कार्यालयात 21 टेबल च्या माध्यमातून मतदान कर्मचाऱ्यांना मतदान यंत्राचे वाटप करण्यात येणार असून ही निवडणूक शांततेत व मुक्तपणे पार पाडावी. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत .असे आवाहन तालुका निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी केले आहे.
शिर्डी विधानसभा मतदार संघात बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे .जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान व्हावे. यासाठी विशेष अभियान राबविण्यात आले होते. 20 नोव्हेंबर रोजी मतदान असल्यामुळे मंगळवार 19 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेपासून मतदान साहित्य राहता तहसील कार्यालयातून प्रत्येक मतदान केंद्रावर नेण्यात येणार आहे. त्यासाठी 38 बसेस व 78 जीप नियुक्त करण्यात आले आहेत. दिलेल्या मतदान केंद्रावर ही वाहने मतदान साहित्य पोहोचवणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण दोन लाख 92 हजार 911 मतदार आहेत. यामध्ये एक लाख 49 हजार 399 पुरुष मतदार आहेत तर एक लाख 43 हजार 504 स्री मतदार आहेत .तर तृतीयपंथी मतदार आठ आहेत. सेनादलातील मतदार 341 इतके आहेत. गृहमतदान 198 मतदारांनी मागणी केली होती त्यात 192 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान प्रक्रियेत मतदारांना सहकार्य व्हावे म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओ ची नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांगासाठी व्हीलचेअर ची सुविधा तसेच मतदारांसाठी वेटिंग रूम ,पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्युत पुरवठा ,आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच स्वयंसेवकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघात लोणी बुद्रुक ,लोहगाव व शिर्डी येथे तीन आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. ती सजवली जाणार आहेत.
0 Comments