लोहगाव (वार्ताहर)
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित एम ए आय डी सी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच गुरुकृपा ॲग्रो एजन्सी लोहगाव यांच्या सौजन्याने दीपावली पाडवा निमित्त विविध अवजार यंत्रांचा तसेच दंडवते ट्रॅक्टर यांच्या सहकार्याने अवजारे वितरण योजनेचा शुभारंभ पार पडला सदर कार्यक्रमाचे आयोजन गुरुकृपा ॲग्रो एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेली होते सदर कार्यक्रम शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एम आय डी सी चे अधिकारी उपस्थित होते . प्रमुख पाहुणे म्हणून माननीय ओमकार आगळे पाटील संचालक महा फाउंडेशन. तसेच प्रगतशील शेतकरी बाबासाहेब भाऊराव पाटील चेचरे सौ पुष्पलता बाबासाहेब चेचरे सचिन बाबासाहेब चेचरे यांचे मोलाचे योगदान लाभले .
शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची माहिती या कार्यक्रमाच्या मार्फत सांगण्यात आली शासकीय योजनेचा लाभ कसा घ्यावा फायदा कसा करून घ्यावा ही या ठिकाणी अध्यक्ष भाषणात सांगण्यात आले. तसेच इथुन पुढील काळात स्प्रे अथवा फवारणी करण्यासाठी कमीत कमी खर्चात द्रोण फवारणी करून वेळेची मजुरीची बचत कशी करता येईल हेही याप्रसंगी सांगण्यात आले. गुरुकृपा ॲग्रो एजन्सी चे संचालक अक्षय बाबासाहेब पाटील चेचरे यांनी सुरू केलेला स्तुत्य उपक्रम नक्कीच शेतकऱ्यांचा फायद्याचा राहू शकतो असे शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या कारण एक युवा उद्योजक या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिसराला सुजलाम सुफलाम व नवनवीन तंत्रज्ञान कसे अवगत करायचे या संदर्भात वेगवेगळे कार्यक्रम प्रवरा परिसरात घेत असून त्याचा शेतकऱ्यांनी नक्कीच फायदा करून घ्यावा असेही विखे पाटील यांनी संबोधित केले
सदर कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील विविध शेतकऱ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला व योजनांची माहिती जाणून घेतली तसेच काही शेतकऱ्यांनी अवजारांची पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किरण चेचरे सर यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार श्री प्रशांत पोपटराव पाटील उंबरकर यांनी मांडले.....
0 Comments