लोहगाव (वार्ताहर )
शिर्डी विधानसभा मतदारसंघात लोहगाव येथे ७४.३९टक्के मतदान उत्साहात संपन्न.
20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर सकाळी मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. शांततेत व मोठ्या उत्साहात मतदान पार पडले दिवसभर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा बघायला मिळाल्या सायंकाळी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर मतदारांनी धावपळ उडाली दोन्हीही प्रतिस्पर्धी उमेदवार हे स्थानिक असल्यामुळे परिसरात प्रत्येक गावात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळाला.
लोहगाव येथील बूथ क्रमांक व आकडेवारी *१६३. एकुण मतदार १२७२..झालेले मतदान.१०२९..एकुण टक्के वारी.८०.२९
*१६४.एकुण मतदान ११८२..झालेले मतदान.८५७..एकुण टक्के वारी.७२.५०
*१६५ एकुण मतदार ९१४.झालेले मतदान६२३.टक्केवारी ६८.१६.मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता.
0 Comments