टाकळीभान येथे विधानसभेचे ७१.४८% मतदान( मतदानासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद)



टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)

 श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे ७१.४८% मतदान झाले असून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मतदानासाठी दिसून आला. दुपारनंतर मतदानासाठी गर्दी वाढून लांबच लांब पर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे काही बुथवर सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदान प्रक्रियेचे कामकाज सुरू होते.
 एकूण ८३१० मतदारांपैकी ५९४० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडला नसून शांततेत मतदान पार पडले. महिला मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाल्याने त्या कोणाच्या पदरात आपल्या मताचे माप टाकतात यावरून तर्क वितर्क लावले जात आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पो. निरीक्षक दशरथ चौधरी, स. फौजदार गोरे दादा,पो.ना. अनिल शिंगाळे, बाबा सय्यद व सुरक्षा पथकाने चोख बंदोबस्त ठेवून काळजी घेतली.

Post a Comment

0 Comments