शिर्डी विधानसभा मतदारसंघात सर्वत्र शांततेत व उत्साहात सुरू आहे मतदान! ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सर्व विखे परिवाराने केले मतदान!राज्यात 165 ते 170 जागा महायुतीला मिळतील--ना. विखे पा.

शिर्डी . लोहगाव (प्रतिनिधी)
शिर्डी विधानसभा  मतदारसंघांमध्ये आज बुधवार 20 नोव्हेंबर 2024 सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरुवात झाल्यानंतर सकाळी मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. सर्वत्र शांततेत व मोठ्या उत्साहात मतदान होत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत जवळजवळ 50% च्या पुढे मतदान झाल्याचे समजते.


 महायुतीचे उमेदवार राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सौ. शालिनीताई विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील, सौ धनश्री सुजय विखे पाटील व सर्व विखे परिवाराने व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पा. यांनी सकाळी लोणी येथे मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नामदार विखे पाटील म्हणाले की, लोकशाही मजबूत बनवण्यासाठी आपण मतदान करणे गरजेचे आहे. मतदान करणे आपला अधिकार असून ही जबाबदारी प्रत्येकाने प्राधान्याने बजावले पाहिजे. मतदान झाल्यानंतर प्रसार माध्यमाशी पुढे बोलताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार असून यावेळी ही राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. राज्यातील जनतेचा महायुती सरकारवर विश्वास आहे.महायुती सरकारला राज्यात 165 ते 170 जागा मिळणार आहेत. असा दावाही ना. विखे पाटील यांनी केला आहे. मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने मला 80 हजार मतांनी निवडून दिलं होतं यावेळी तब्बल एक लाख मतांनी निवडून येणार, असा विश्वासही ना.विखे पा. यावेळी व्यक्त केला.
त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभावती ताई घोगरे यांनीही मतदान केले. अपक्ष उमेदवार डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनीही मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. त्याचप्रमाणे तिन्हीही उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते, इतर अपक्ष उमेदवार यांनी शिर्डी मतदार संघातील गावागावांना भेटी देत मतदान केंद्रात जाऊन पाहणी केली. शिर्डी विधानसभा मतदारसंघात शांततेत व उत्साहात मतदान सुरू असून सर्वत्र पोलीस बंदोबस्त आहे. मतदारांचाही चांगला प्रतिसाद सर्वत्र मिळत आहे. निवडणूक अधिकारी ही मतदान केंद्रांना भेटी देत आहेत.

Post a Comment

0 Comments