ज्येष्ठ पत्रकार कोंडीराम नेहे यांना प्रतिष्ठित असा भारतीय लहुजी सेनेचा जांभेकर समाजभूषण पुरस्कार जाहीर! 30 नोव्हेंबरला श्रीरामपूरला होणार हा पुरस्कार प्रदान!


शिर्डी (प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्ह्यातील लोहगाव प्रवरानगर येथील ज्येष्ठ पत्रकार कोंडीराम नेहे यांना भारतीय लहुजी सेनेच्या वतीने प्रतिष्ठित असा जांभेकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
   भारतीय लहुजी सेनेच्या वतीने सेनाप्रमुख व्ही.जी रेड्डी , यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनीफ भाई पठाण व कायदेशीर सल्लागार रमेश बी कोळेकर यांच्या सहीनीशी ज्येष्ठ पत्रकार संपादक कोंडीराम नेहे यांना नुकतेच तसे पत्र देण्यात आले असून या पत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे की, आपण अल्पावधीतच आपल्या सामाजिक कार्यात विशेष योगदान देऊन सर्व सामान्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले असल्याने आपल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आपणास जांभेकर समाजभूषण पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. क्रांती गुरु लहुजी साळवे यांचा जन्मोत्सव सोहळा दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक रेल्वे स्टेशन, श्रीरामपूर येथे संध्याकाळी सात वाजता पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे .या पुरस्कार वितरण सोहळ्याला विविध मान्यवर उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तरी सदर सोहळ्यात आपण उपस्थित राहून आपला गौरव व मानचिन्ह स्विकारण्या करीता आपले हितचिंतक मित्रा सह उपस्थित रहावे, असे सुचित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जांभेकर समाज भूषण पुरस्कार आपणास प्राप्त झाल्याबद्दल आपले अभिनंदन करण्यात येत आहे. असे भारतीय लहुजी सेनेच्या वतीने या पत्रकात म्हटले आहे. या पत्रकावर भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफभाई पठाण, सल्लागार रमेश बी कोळेकर यांच्या सह्या आहेत.
ज्येष्ठ पत्रकार व दैनिक सत्तेचा महासंग्राम या डिजिटल पोर्टल न्यूज चे संपादक कोंडीराम नेहे अनेक वर्षापासून पत्रकारितेत काम करत असून त्यांनी दैनिक प्रभात, दैनिक गावकरी.  दै  लोकमत .दै सामना . दै.सार्वमत, आदी अनेक वृत्तपत्रात काम केलेले आहे व काम करत आहे. पत्रकारिता करण्याबरोबरच सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात. राहाता तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तसेच. लोहगाव        सोसायटीत विद्यमान संचालक आहे.          
पत्रकारीतेच्या माध्यमातून  सर्वसामान्यांचे, गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यास अधिक भर देण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. अशा त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारतीय लहुजी सेनेच्या वतीने कोंडीराम नेहे यांना जांभेकर समाजभूषण हा मानाचा पुरस्कार जाहीर केला असून तो क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या जन्म उत्सव सोहळा दिनी तीस नोव्हेंबर 2024 रोजी श्रीरामपूर येथे प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार कोंडीराम  नेहे यांना जाहीर झाल्याने त्यांचे तालुक्यातील, जिल्ह्यातील पत्रकार तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments