आळंदी (प्रतिनिधी) संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा व मंगळवारी, २६ नोव्हेंबर रोजी अर्थात कार्तिकी एकादशीला आळंदी यात्रा आहे. मंगळवारी रात्री १२: ३० ते २ वाजेपर्यंत ११ ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर पवमान अभिषेक आणि दुधारती होईल. तसेच दर्शनरांगेतील पहिल्या दाम्पत्याला महापूजेचा मान दिला जाणार आहे.
राज्यातील वारकऱ्यांना आळंदीच्या कार्तिकी एकादशीचे वेध लागले आहेत. अनेक पायी दिंड्या आळंदीत दाखल झाले आहेत.तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचीही आस लागून राहिलेली आहे. दरवर्षी लाखो वारकरी या संजीवन समाधी सोहळ्याला उपस्थित राहत असतात. यावर्षी २३ नोव्हेंबर रोजी संजीवन समाधी सोहळा सुरू झाला. तेव्हापासून श्री क्षेत्र आळंदी येथे भाविकांची मोठी गर्दी होत आहे.मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी महाराजांच्या ७२८ वा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे.
या संजीवन सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.
शनिवार, दिनांक २३ नोव्हेंबर रोजी हैबतबाबा यांचे वंशज हभप बाळासाहेब पवार यांच्यातर्फे हैबतबाबांच्या पायरीच्या पूजनाने संजीवन समाधी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. आता मंगळवारी, २६ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी, अर्थात आळंदीची यात्रा आहे. मंगळवारीरात्री १२.३० ते पहाटे २ - ११ ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात माउलींच्या समाधीवर पवमान अभिषेक आणि दुधारती होईल. यावेळी दर्शनरांगेत उभ्या असलेल्या पहिल्या दाम्पत्याला महापूजेचा मान दिला जाईल.
सकाळी ९ ते ते दुपारी १२ - हरिभक्त पारायण नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन पार पडेल.
दुपारी १२ ते १२.३०- या वेळेत ७२८ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त घंटानाद, पुष्पवृष्टी, आरती आणि मान्यवरांना नारळप्रसाद दिला जाईल.रविवार, १ डिसेंबर रोजी रात्री ९.३० ते १२.३० या वेळेत श्रींचा छबीना मिरवणूक पार पडेल.या सोहळ्यादरम्यान २३ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर या कालावधीत माऊली मंदिरात दररोद पवमान अभिषेक होईल. तसेच दुधारती करण्यात येईल. भाविकांच्या हस्ते महापूजा पार पडेल, तसेच महानैवेद्य दाखवला जाईल. शिवाय कीर्तनाचा कार्यक्रम पार पडेल. तसेच धुपारती जागर असे धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येत आहे.
कार्तिक वद्य भागवत एकादशी (२६ नोव्हेंबर)
कार्तिकी एकादशी यात्रेच्या दिवशी रात्री १२.३० चे पहाटे २ या कालावधित ब्रह्मवृदांच्या वेदघोषात पवमान अभिषेक करण्यात येईल. तसेच दुधारती होईल. त्याच प्रमाणे दुपारी १२ ते १२.३० या कालावधीत महानैवेद्य दाखवण्यात येईल. दुपारी १ वातजा श्रींची नगर प्रदक्षिणा होईल. रात्री ०८.३० वाजता धुपारती होईल. रात्री १२ ते पहाटे २ वाजेपर्यंत जागराचा कार्यक्रम होईल.
कार्तिक वद्य द्वादशीचा कार्यक्रम ( २७ नोव्हेंबर)
पहाटे २ ते ०३.३० - पवमान अभिषेक, दुधारती.
पहाटे ०३.३० ते ४ - पंचोपचार पूजा,पहाटे ०३ ते ०६- मुक्ताई मंडपात नांदेडकर मंडळींची दिंडी क्रमाक १५ यांच्यातर्फे काकडा भजन सेवा.पहाटे ५ ते सकाळी ११.३०- श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापूजा
दुपारी १२ ते १२.३०- महानैवेद्य
दुपारी ०४ ते ०७- रथोत्सव
दुपारी ०४ ते ०६- वीणा मंडपात हभप हरिभाऊ बडवे यांच्या तर्फे कीर्तन सेवा.
रात्री ८.३० ते ९- धुपारती
रात्री ९ ते ११- वीणा मंडपात हभप केंदूरकर महाराज यांच्या तर्फे कीर्तन सेवा.
रात्री ११ ते १२- पास धारक, खिरापत पूजा, प्रसाद वाटप, वीणा मंडपात, तसेच श्रींच्या गाभाऱ्यात फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप होणार आहे.
कार्तिक वैद्य त्रयोदशी (२८ नोव्हेंबर)
पहाटे ०३ ते ०४- पवमान अभिषेक व दुधारती
पहाटे ०५ ते ०९.३०- श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापूजा,
सकाळी ०७ ते ०९- हैबतबाबा पायरीपुढे हभप हैबतबाबा आरफळकर यांचे कीर्तन
सकाळी ०७ ते ०९- वीणा मंडपात कीर्तन,
सकाळी ०७ ते ९- भोजलिंग काका मंडप येथे दाणेवाले निकम दिंडी यांचे कीर्तन,
सकाळी ०९ ते ११ - भोजलिंग काका मंडप येथे दाणेवाले निकम दिंडी यांच्या तर्फे कीर्तन सेवा.
सकाळी ०९ ते १२- हभप नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन होईल
दुपारी १२ ते १२.३०- ७२८ व्या संजीवन समाधी दिनानिमित्त घंटा नाद, पुष्पवृष्टी व आरती, मान्यवरांना नारळ प्रसाद.
दुपारी १२.३० ते ०१- महानैवेद्य
सायंकाळी ०६.३० ते ०८.३० वीणा मंडपात हभप सोपानकाका देहूकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा.
रात्री ०९ ते ११.३०- श्रींची गुरुवार पालखी,रात्री ११.३० ते १२- धुपारती,
रात्री ०९.३० ते ११.३० - कारंजा मंडपामध्ये हरिभाऊ बागडे व पंढरी केसरकर यांच्यातर्फे भजन
रात्री १२ ते पहाटे ०४- हैबतरावबाबा आरफळकर यांच्यातर्फे जागर.
कार्तिकी आमावस्या रविवार, दिनांक ०१ डिसेंबर
पहाटे ०३ ते ०५ - पवमानपूजा, दुधारती.सकाळी ०५ ते ११- श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापूजा.
दुपारी १२.३० ते ०१- महानैवेद्य.
रात्री ०८ ते ०८.३०- धुपारती.
रात्री ०९.३० ते १२.३० - श्रींचा छबिनारात्री १२.३०- शेजारती. असा हा संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होणार आहे. श्री क्षेत्र आळंदी येथे अनेक पायी दिंड्या तसेच लाखो वारकरी दाखल झाले असून ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊलीचा गजर सर्वत्र गुंजत आहे. इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी भरून गेला असून स्नानाला गर्दी होत आहे. जिकडे तिकडे कीर्तन, प्रवचन, भजन सुरू आहे.
0 Comments