प्राईम अकॅडमीच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धा उत्साहात संपन्न .




टाकळीभान:(सत्तेचा महासंग्राम न्युज)
 टाकळीभान येथील प्राईड अकॅडमी प्री स्कूल येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच ऐतिहासिक गोष्टींचे त्यांना ज्ञान अवगत होऊन त्यांची जपवणूक व्हावी या उद्देशाने प्राइड अकॅडमीच्या सचालिका डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्या संकल्पनेतून  गड किल्ले बनवा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. 


यावेळी चिमुकल्यांनी गड किल्ले बनवा स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभाग घेऊन आपल्या सुंदर सुबक,कल्पकतेतून हुबेहूब किल्ले गड बनवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जंजिरा,राजगड, तोरणा, आदी किल्ले मुलांनी बनविले. यामध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांच्या निरीक्षणातून चिट्ठी पद्धतीने मत नोंदवून या गडकिल्ल्यांच्या स्पर्धेमध्ये राजगड किल्ल्याच्या कलाकृतीची निवड करण्यात आली. व राजगड किल्ला कलाकृती बनवणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांना छत्रपती शिवरायांची मूर्ती व रोख बक्षीस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्पर्धेतील सर्वच किल्ले विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट बनविले होते, त्याचे सर्व मान्यवरांनी गड किल्ले स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या चिमुकल्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले. याप्रसंगी याप्रसंगी टाकळीभान येथील ज्येष्ठ ग्रामस्थ आण्णासाहेब दाभाडे, पत्रकार दिलीपराव लोखंडे, बापूसाहेब नवले ,अर्जुन राऊत, अमृत बोडखे, सुरेश कोकणे, प्राईड अकॅडमीच्या शिक्षक-शिक्षिका 
अदिती जंगम , निकिता शिरसाट, सुप्रिया कोकणे,अनुष्का काळे, जयश्री वाडेकर आदींसह स्टाफ कर्मचारी,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments