बिबट्यांच्या दहशतीत वाकडी गाव! चार दिवसात वन विभागाने पिंजरे लावावेत! अन्यथा एक दिवस गाव बंद आंदोलन---- विठ्ठलराव शेळके

लोहगाव (प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील वाकडी व शिवारात गेल्या काही दिवसापासून बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे‌ येथे बिबटे आढळून येत असून या बिबट्यांना येथे वन विभागाने पिंजरे लावून जेरबंद करावे. चार दिवसात येथे पिंजरे लावले नाही तर एक दिवस वाकडी गाव बंद आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे.

 राहात्याचे तहसीलदार यांना दिलेल्या पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की,राहाता तालुक्यात वाकडी व शिवारामध्ये बिबट्याचा वावर आढळून येत आहे. बिबट्यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे . बिबट्याने गेल्या काही दिवसापूर्वी वाकडी चितळी रोडवर वाघ वस्तीवर  एका मुलास मारले होते. तेव्हापासून येथे पिंजरा लावायची मागणी आहे. सध्या वाकडी दिघी रोडवरही बिबट्या आढळून येत आहे. लहान मुले, शाळेत जाणारे विद्यार्थी, शेतकरी, महिला यांच्यामध्ये त्यामुळे भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाकडी व शिवारामध्ये वन विभागाने त्वरित पिंजरे लावावेत. चार दिवसात बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरे लावले नाही तर वाकडी गाव एक दिवस बंद ठेवून आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके, यांनी एका पत्रकाद्वारे दिला असून या पत्रकावर प्रदीप जगदाळे, महेश लहारे, शंकरराव लहारे, महेश जाधव, रुपेंद्र काळे यांची नावे व सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments