टाकळीभान बागायतदार सोसायटीच्या वतीने दिवाळी निमित्त १५ किलो साखर वाटप.

टाकळीभान, (प्रतिनिधी ) 
टाकळीभान बिग बागायतदार विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने संस्थेच्या सभासदांना दिवाळी निमित्त भेट म्हणून १५  किलो साखर वाटप करण्यात आली आहे.  संस्थेचे संस्थापक माजी सभापती नानासाहेब 
पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या
संस्थेची दरवर्षी शंभर टक्के वसुली होत असून दर वर्षी सभासदांना दिवाळी निमित्त साखर वाटप केली जाते.
      

  यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिपक डुकरे, उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे,  शिवाजीराव धुमाळ, रमेश धुमाळ, रावसाहेब मगर,   चित्रसेन रणनवरे, दिपक कांबळे, विकास मगर, रमेश पटारे, अशोक धोत्रे, मिथुन जाधव, तांबे, योगेश नवघने, सचिव विजय देवळालकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments