प्रवरानगर (सत्तेचा महासंग्राम न्युज)
युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अकोले तालुका अध्यक्षपदी युवा पत्रकार शांताराम दराडे यांची नियुक्ती करण्यात आली.
राहाता तालुक्यातील कोल्हार बु! येथे पार पडलेल्या संघाच्या बैठकीत शांताराम दराडे यांची नियुक्ती करण्यात आली, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भोसले यांचे हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देत शुभेच्छा देण्यात आल्या प्रसंगी नाशिक विभागीय अध्यक्ष शरद तांबे, राहाता तालुकाध्यक्ष सुभाष कोंडेकर, सचिव प्रतीक केदार उपस्थित होते. प्रसंगी बोलताना बाळकृष्ण भोसले म्हणाले, पत्रकारांबरोबर समाजातील विविध घटकांच्या समस्यांप्रती समर्पित भावनेने काम करत असलेल्या युवा ग्रामीण पत्रकार संघाने अल्पावधीतच राज्यभर पत्रकारांचे मोठे संघटन राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या नेतृत्वाखाली उभारले आहे. त्यायोगे पत्रकार तसेच समाजातील अनेकविध जनतेला त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी संघटना नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. तालुका, जिल्हा, राज्य पातळीवरील शासन, प्रशासनातल्या बहुतांश प्रश्नांची दखल घेऊन तीचे निराकरण करण्यात संघाला यश आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही संघाने मोठेमोठे संघटनेचे जाळे उभारले असल्याचेही ते म्हणाले.
0 Comments