टाकळीभान- (सत्तेचा महासंग्राम न्युज)
श्रीरामपूर तालुक्यातील खानापुर शिवारात बिबट्याने धुमाकूळ
घालत भरदिवसा शेतकर्यावर हल्ला केल्याने परीसरात बिबट्याच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की सायंकाळी ५.३० च्या सुमारास खानापुर येथील येथील शेतकरी आप्पासाहेब दगडू आदिक हे गोदावरी नदी ओलांडून खानापूर - माळवाडगांव रस्त्याने येत असतांना त्याच्या दुचाकी गाडीवर शेजारील शेतात लपलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली.यामधे आदिक हे दुचाकीसह खाली पडले व या दरम्यान त्यांच्या पायाला व खांद्याला बिबट्याच्या नख्या लागुन जखमा झाल्या आहे. आदिक यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने शेतात धुम ठोकली.दुचाकीवर असल्यामुळे आदिक हे हल्ल्यातुन बचावले.
माळवाडगांव येथील आरोग्य केंन्द्रात डॉक्टर उन्मेश लोंढे यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. बिबट्याबाबत वारंवार तक्रारी करुन देखील वनविभागाने दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी संतप्त शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
0 Comments