शिर्डी (प्रतिनिधी) केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी मंगळवारी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्री साई मूर्ती शाल तसेच श्री साई डायरी व प्रसाद देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मंदिर प्रमुख विष्णु थोरात, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले शिर्डीत आल्याचे समजताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, हेही त्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिर्डीत आले होते. आगामी विधानसभा निवडणुका या संदर्भातही नामदार रामदास आठवले व कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. यावेळी दीपक गायकवाड, कैलास शेजवळ, आदींसह विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments