बाभळेश्वर येथे वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा

पत्रकार प्रकाश औताडे  बाभळेश्वर



बाभळेश्वर(वार्ताहर) राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी बाभळेश्वर येथे गेली अनेक वर्षे वृत्तपत्र विक्री करणारे मच्छिंद्र गोरे यांचा माहिती अधिकार संघर्ष समितीच्यावतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.


                वृत्तपत्र विक्रेत्याला मिळणारा मान, पावसाळा असो कि हिवाळा भल्या पहाटे उठून वर्तमानपत्राचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे त्यानंतर पायी, सायकलवरून घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करण्याचा नित्यक्रम पाळणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा आज सन्मान होत आहे असे मत रयतचे प्राचार्य प्रमोद तोरणे यांनी व्यक्त केले.  
              राज्य शासनाने वृत्तपत्र विक्रेत्याला मान देवून त्यांच्यासाठी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करून इतर कामगारांना ज्याप्रमाणे लाभ मिळतो त्या धर्तीवर वृत्तपत्र विक्रेत्यांना देखील सर्वांगीण लाभ मिळावा अशी अपेक्षा वृत्तपत्र विक्रेते मच्छिंद्र गोरे यांनी व्यक्त केले.
                यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोकुळ बेंद्रे, आयुब शेख, रामसिंग पंजाबी, राजू शेख जावेद शेख आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार माहिती अधिकार संघर्ष समितीचे अध्यक्ष गोरखदादा गवारे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments