छत्रपती संभाजीनगर महामार्गावर खाजगी बसला अचानक आग लागली.

छत्रपती संभाजीनगर (सत्तेचा महासंग्राम न्युज)

छत्रपती संभाजीनगर महामार्गावर  खाजगी बसला अचानक आग लागली.हि घटना पहाटे पाचच्या सुमारास घडलेली आहे.
सुदैवाने बसमधील १५ प्रवासी बचावले आहेत.
या आगीत बस जळुन खाक झाली आहे.
पुण्याहुन जामोद कडे  निघालेल्या खाजगी बसला नेवासा तालुक्यातील खडका टोल नाका येथे आग लागली.


प्राथमिक माहितीनुसार बसचा टायर फुटल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे.

आगेची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या सह पोलीस घटनास्थळी पोहोचली आहेत बसमधील सर्व प्रवासी खाली उतरली आहे वाहतूक सुरळीत चालू केली असल्याची माहिती जाधव यांनी दिली तसेच भेंडा येथील लोकनेते मारुतीराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना अग्निशामक दल पोहोचले व आग विझवण्यात आली.

Post a Comment

0 Comments