टाकळीभान:( प्रतिनिधी :-)
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे बुधवार दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक १०. वाजता विधानसभा२०२४ निवडणूक अनुषंगाने श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन तसेच इंडिया तिबेट बॉर्डर पोलीस यांच्या पथकाच्या वतीने टाकळीभान गावामध्ये पथसंचलन करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी ,अंमलदार यांची चार पोलीस वाहनासह पथकाने गावात रुटमार्च काढून पथसंचलनाद्वारे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस यंत्रणेच्या वतीने जनतेला आवाहन करण्यात आले.
या पथसंचलना मध्ये श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पी.एस. आय. मुरकुटे, पीएसआय शिंदे, सहायक फौजदार सतीश गोरे ,हे. कॉ. राजू त्रिभुवन हे. कॉ. दादासाहेब लोंढे ,बडे, चांद पठाण, पो.ना. अनिल शेंगाळे, बाबा सय्यद आदींसह पोलीस कर्मचारी व इंडिया तिबेट बॉर्डर पोलीस पथक सहभागी झाले होते.
0 Comments