लोहगाव येथे बाबासाहेब भाऊराव चेचरे यांच्या वस्तीवर शेती विषयक मार्गदर्शनाचा कार्यक्रम.

राहाता तालुक्यातील लोहगाव येथे गुरुवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता गुरुकृपा ऍग्रो ट्रेडर्स लोहगाव यांच्या संकल्पनेतून स्नेहसंमेलन  व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजन करण्यात आलेले आहे.


 सदर कार्यक्रमाची नियोजन गुरुकृपा ऍग्रोचे संचालक अक्षय बाबासाहेब चेचरे यांनी केले आहे. कार्यक्रमा प्रसंगी  रब्बी हंगामातील पिकांच्या खतांची मागणी पुरवठा व नियोजन व्यवस्थापन तसेच सेंद्रिय शेती नव्या युगाची गरज ‌या संदर्भात चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आहे.तरी कार्यक्रमासाठी  लोहगाव परिसरातील शेतकरी बांधवांनी तसेच बाभळेश्वर. कोल्हार. लोणी‌ या परिसरातील शेतकऱ्यांनी सदर चर्चा सत्राचा लाभ घ्यावा असे आयोजकाच्या वतीने करण्यात आलेली आहे. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय योगेश बिडवे साहेब विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ ‌.डॉ. प्रशांत नाईकवाडी सेंद्रिय शेतीचे धोरण. 
सौ शैलेजा नांवदर ताई सेंद्रिय शेती फळबाग व्यवस्थापन यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हर्षद निघुते. प्रशांत उंबरकर. अनिकेत झावरे. कैलास दिवटे .ऋषिकेश काळे. अनिल हारदे हे मान्यवर उपस्थित राहणार आहे.

Post a Comment

0 Comments