टाकळीभान, प्रतिनिधी - टाकळीभान येथे आज सोमवार दिनांक ७ रोजी टाकळीभान विविध कार्यकारी सोसायटीच्या प्रांगणात
ईव्हीएम मशीनद्वारे मतदान बाबत जनजागृती करण्यात आली व मतदानाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांसाठी ईव्हीएम बाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) असलेली व्हॅन जिल्ह्यातील विविध मतदान केंद्र, शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजाराच्या ठिकाणी फिरविण्यात येत असून नागरिकांना या व्हॅनच्या माध्यमातून ईव्हीएम मशीन बाबत माहिती देण्यात येत आहे.
या ईव्हीएम व्हॅन मध्ये बहुमाध्यम वैशिष्ट्ये (मल्टीमीडिया फीचर्स) असून मतदान करताना ईव्हीएम चा वापर कसा करावा याबाबत चित्रफीत दाखवण्यात येत आहे. या व्हॅन द्वारे ईव्हीएम विषयी जनजागृती करण्यात येत आहे. गावा-गावात ईव्हीएम व्हॅन च्या माध्यमातून प्रात्यक्षिकाद्वारे नागरिकांना माहिती देण्यात येत आहे.
यावेळी कामगार तलाठी हेमंत डहाळे यांनी
उपस्थित नागरिकांना ईव्हीएमद्वारे मतदान या बाबत
माहिती दिली व मतदानाचे प्रात्यक्षिक नागरिकांकडून
करून घेतले.
यावेळी तलाठी रूपाली रामटेके, पाराजी पटारे, रघुनाथ शेळके, मोहन रणनवरे, रवि शिरसाठ, बनकर, काका रणनवरे, पो. काँ व्ही पी थोरात, निलेश कांजवणे व पत्रकार विजय देवळालकर बाबासाहेब बनकर पो काॅ थोरात,आदी उपस्थित होते.
टाकळीभान— येथे ईव्हीएम बाबत जनजागृती करण्यात आली यावेळी उपस्थित ग्रामस्थ व तलाठी
हेमंत डहाळे, रूपाली रामटेके, पो. काँ व्ही पी थोरात.
0 Comments