राहाता (प्रतिनिधी)
असा सवाल अहिल्यानगर शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी केला आहे गेली तीन महिन्यांपूर्वी नाफेडमाफ॔त कांदा खरेदी करु अशी घोषणा केली परंतु अद्यापपर्यंत खरेदी सुरू न झाल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
केंद्र सरकारकडून एनसीसीएफमाफ॔त तिन लाख मॅट्रिक टन कांदा नाफेड खरेदी करू अशी घोषणा केली परंतु अद्यापपर्यंत खरेदी सुरू न झाल्याने कांदा १५०० ते १८०० रुपये विकला जात कांदा उत्पादनासाठी एक किंव्टलला २५०० रुपये खर्च येतो तरी सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीकडून ३००० रूपये दराने खरेदी सुरू करावी अशी मागणी शेळके यांनी केली आहे शिवाय सतत पावसामुळे कांदा चाळीत खराब होत आहे चालू भावाने उत्पादन खर्च भरून शकत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी आज गरज आहे तरी तातडीने नाफेडने कांदा खरेदी सुरू करावी केंद्र सरकारकडून अनेक घोषणा केल्या जातात तसेच राज्य सरकारने केलेल्या घोषणा कागदावरच आहे कुठल्याही शेतमालाला योग्य भाव मिळत नाही शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे केंद्र सरकारने शेतमालाची निर्यात बंदी घालण्यात आली यामुळे ७००० रूपये दराने विकणारी सोयाबीन ४००० रूपये दराने विक्री होते तसेच दुधाचे भाव कमी झाले आहे तरी ताबडतोब कांदा खरेदी केंद्र सुरू करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
0 Comments