टाकळीभान येथील प्रति पंढरपूर चतुर्भुज विठ्ठल मूर्ती दर्शनासाठी भाविकांची गर्दी

टाकळीभान, ( वार्ताहर ) श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील पुरातन यादव कालीन व प्रती पंढरपूर ओळखल्या जाणार्‍या श्री.विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आज रविवार दिनांक ६ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त श्री. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळे दर्शनासाठी मंदिरात सकाळ पासून रांग लागली होती.
        येथील श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिर हे टाकळीभानसह परिसरातील गावांचे श्रद्धास्थान असल्याने टाकळीभान व परिसरातील श्रीरामपूर, भोकर, खोकर, कमालपूर, घुमनदेव, वांगी, खिर्डी, गुजरवाडी, कारवाडी, बेलपिंपळगाव, पाचेगाव आदी ठिकाणांहून भाविक दर्शनासाठी आले होते. श्रीरामपूर येथील डॉक्टर, वकील, व्यावसायिक यांनी पायी दिंडी काढून श्री.विठ्ठलाचे दर्शन घेतले. 
                  आषाढी एकादशी निमित्त श्रीरामपूर येथील योगेश देशपांडे या भाविकाने एक क्विंटल खिचडीचे वाटप केले. तसेच उपसरपंच कान्हा खंडागळे यांचे वतीने केळी वाटप तसेच रावसाहेब गायकवाड तसेच इतर भाविकांनीही फराळाचे वाटप केले. 
             पहाटे ४. ३० ते ५  यावेळेत श्री. विठ्ठल रूख्मिणी मातेला गंगाजलाने स्नान व अभिषेक करण्यात आला. ५.३० ते ६ वाजता या वेळेत प्रांताधिकारी किरण सावंत व सौ.मनिषा सावंत यांच्या हस्ते उत्सव मूर्तीची पूजा व आरती करण्यात आली. दुपारी १२ वाजता आरती झाली त्यानंतर भजन झाले. 
                आरती नंतर प्रांताधिकारी किरण सावंत व सौ.मनिषा सावत यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष नानासाहेब पवार, सचिव नानासाहेब लेलकर,  विश्वस्त बापूसाहेब पटारे, वासुदेव साबळे, सोसायटीचे माजी अध्यक्ष एकनाथ पटारे तसेच भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.
      यावेळी बोलतांना प्रांताधिकारी सावंत म्हणाले की, पांडूरंगा भरपूर पाऊस पडू दे व बळीराजाला सुख समृद्धी लाभू दे असे साकडे आपण विठ्ठलाला घातल्याचे त्यांनी सांगितले.
         

येथील श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त श्री. विठ्ठलाच्या दर्शनासाठी सकाळपासून रांग लागली होती.  प्रांताधिकारी किरण सावंत व मनिषा सावंत यांचे हस्ते आरती करण्यात आली.

Post a Comment

0 Comments