. श्रीरामपूर : येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त सुखदेव सुकळे लिखित 'ज्ञानदीप' ग्रंथाचे प्रकाशन, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव, प्राचार्य शिवाजीराव भोर यांना स्व. ॲड. रावसाहेब शिंदे राज्यस्तरीय स्मृती जीवनगौरव पुरस्कार, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये यांना मराठी साहित्यविश्वातील तज्ज्ञ समीक्षक डॉ.र.बा. मंचरकर राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार, कवयित्री संगीता फासाटे/ कटारे यांना स्व. सौ. पुष्पा सुखदेव सुकळे राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून नेवासा येथील सेवानिवृत्त प्राचार्य रघुनाथराव आगळे होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य श्री डी. एस्. वडजेबापू होते. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजीव रावसाहेब शिंदे, कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके, माजी प्राचार्य शंकरराव अनारसे, सुखदेव सुकळे, डॉ. शिवाजी काळे, डॉ. प्रकाश मेहकरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी प्रतिमापूजन करण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. सर्व पाहुण्यांचा आणि पुरस्कारार्थींचा सत्कार करण्यात आले. सुखदेव सुकळे लिखित 'ज्ञानदीप' ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मानपत्रांचे वाचन अनुक्रमे प्रा. गोरक्षनाथ बनकर, प्रा. शिवाजीराव बारगळ, सौ. वैष्णवी सुयोग बुरकुले यांनी केले. यावेळी प्राचार्य रघुनाथराव आगळे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी 'ज्ञानदीप' पुस्तकाची सुंदर अक्षरजुळणी करणाऱ्या श्रीरामपूरच्या सौ. अनिता बाबुराव शर्मा, पुणे येथील वसंतवर्षा नियतकालिकाचे संपादक प्राचार्य विठ्ठलराव सोनवणे आदिंचा सत्कार करण्यात आला. नाशिक येथील डी.एस. वडजेबापू यांनी
अध्यक्षीय भाषणात सांगितले की, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव, प्राचार्य शिवाजीराव भोर यांना ॲड्. रावसाहेब शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार देण्यात आला, ही कर्मवीर विचारांची, त्यागाची प्रतिष्ठा आहे, प्राचार्य भोर यांनी सुदैव ॲड्, रावसाहेब शिंदे यांची सोबत करून ज्ञानतपस्वी उपक्रम राबविले, त्यामुळेच योग्य व्यक्तीचा हा सन्मान झाला असल्याचे सांगून वडजेबापू यांनी विविध आठवणी सांगून सुकळेसर यांचे कौतुक केले.
यावेळी प्राचार्य शिवाजीराव भोर यांनी मला हा पुरस्कार का देण्यात आला, त्याचे आश्चर्य वाटते, कारण मी काही मोठे आणि रावसाहेबांच्या उंचीचे कार्य केले नाही, परंतु श्रीरामपुरात त्यांच्या स्मृती जपल्या जातात हेच प्रेरणादायी असे सांगितले. डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले, गुरुवर्य डॉ. मंचरकर यांच्या नावाचा पुरस्कार गुरुपौर्णिमेला लाभणे, हा ज्ञानतपस्वी गुरूंचा आशीर्वाद असल्याचे सांगितले. खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था संचलित गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालय, कवयित्री संगीता चंद्रभान फासाटे म्हणाल्या, स्व. पुष्पाताई सुकळे यांच्यासारख्या आदर्श गृहिणीच्या पुरस्कार मला प्रेरणा देत राहील. कार्यक्रमास डॉ. प्रथमा मंचरकर, प्राचार्य विश्वासराव काळे, प्राचार्य डॉ. एकनाथ ढोणे, प्राचार्य डॉ. गोरक्ष बारहाते, प्राचार्य दिनानाथ पाटील,प्रा.डॉ. गजानन वाघ, गुलाबराव पादीर, प्रा. सखाराम कर्डिले महाराज, सुभाष लिंगायत, भाऊसाहेब शिरसाठ, भाऊसाहेब पेटकर, कैलास मोहिते, पत्रकार प्रकाश कुलथे, कवी पोपटराव पटारे, सौ. मंदाकिनी उपाध्ये, सौ. आरती उपाध्ये, मंगलाताई आढाव, मुखाध्यापक श्रीराम कुंभार, दत्तात्रय चव्हाण, सौ. सुरेखा बुरकुले, सौ. शीतल बुरकुले, सौ. उज्वला बुरकुले, सुरेश बुरकुले, सुयोग बुरकुले, संकेत बुरकुले, आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड, भीमराज बागूल, संजय बुरकुले, बाळासाहेब बुरकुले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शिवाजी काळे यांनी केले तर सुदामराव औताडे पाटील यांनी आभार मानले.
0 Comments