सभा मंडप दिल्याबद्दल मा. खा. डॉ. सुजय विखे पा यांचा जाहीर नागरी सत्कार!
राजकुमार गडकरी
शिर्डी (प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील कारवाडी भागात असणाऱ्या प्रसिद्ध अशा श्री लक्ष्मी माता यात्रा उत्सव मंगळवार दिनांक 15 जुलै 2025 रोजी साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढ मंगळवारी हा यात्रा उत्सव साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आकर्षक मंडप व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या यात्रा उत्सवाचे निमित्त साधत येथील श्री लक्ष्मी माता मंदिरासाठी सभामंडप दिल्याबद्दल मा. खा. डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार सोहळा मंगळवार 15 जुलै 2025 रोजी सायंकाळी 7:45 वाजता सावळी विहीर बुद्रुक कारवाडी येथील लक्ष्मी माता मंदिरासमोर आयोजित करण्यात आला आहे. तत्पूर्वी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प अंकिताताई माने( वृंदावन )यांचे जाहीर हरी किर्तन होणार आहे व या कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी ,नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन सावळी विहीर बुद्रुक येथील सर्व ग्रामस्थ, व लक्ष्मी माता मित्र मंडळ , कारवाडी यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
0 Comments